मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये, टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे

दररोज 160 रुपयांच्या बचतीवर मिळतील 23 लाख रुपये, टॅक्स सूटपासून मिळतील अनेक फायदे

जर तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल आणि एलआयसीच्या एखाद्या पॉलिसीच्या शोधात असाल, तर न्यू मनीबॅक पॉलिसी (LIC New Money back Policy) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 30 मे : तुमचं भविष्य तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असल्यास, तुम्ही LIC च्या अनेक पॉलिसीजचा लाभ घेऊ शकता. एलआयसी पॉलिसी अंतर्गत केवळ इन्शोरन्स कव्हरच मिळणार नाही, तर भविष्यासाठी चांगले पैसे जोडण्यासाठीही मदत होईल. सध्या LIC च्या अशा अनेक पॉलिसी पॉप्युलर आहेत. यापैकी काही पॉलिसी लाँग टर्मसाठी आहेत आणि काही कमी कालावधीसाठी आहेत. जर तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल आणि एलआयसीच्या एखाद्या पॉलिसीच्या शोधात असाल, तर न्यू मनीबॅक पॉलिसी (LIC New Money back Policy) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

LIC ची न्यू मनीबॅक पॉलिसी एक प्रकारे नॉन लिंक्ड लाईफ इन्शोरन्स पॉलिसी आहे, जी गॅरेंटी रिटर्न आणि बोनस देते. या प्लॅनची विशेष बाब म्हणजे, यात विमाधारकाला प्रत्येक 5 वर्षाला मनीबॅक, मॅच्योरिटीवेळी चांगले रिटर्न तसंच टॅक्स इन्शोरन्स बेनिफिटही मिळतो.

कसे मिळतील 23 लाख रुपये -

ही पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. त्याशिवाय याच्या व्याजावर, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्योरिटीवेळी मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत दररोज 160 रुपये गुंतवणूक केल्यास, 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील.

(वाचा - Alert! जुना फोन विकताना तो RESET करता का? लीक होऊ शकतो पर्सनल डेटा)

दर पाच वर्षांनी 15 ते 20 टक्के मनीबॅक -

LIC ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन 13 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतचा कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. या प्लॅनमध्ये दर पाच वर्षांनी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी आणि 20 व्या वर्षी 15 ते 20 टक्के मनीबॅक मिळेल. परंतु हे त्याचवेळी होईल, ज्यावेळी प्रीमियमची कमीत-कमी 10 टक्के रक्कम जमा होईल.

(वाचा - Paytm मधून चुकून दुसऱ्यालाच पैसे झाले ट्रान्सफर? जाणून घ्या कसे मिळवाल परत)

त्याशिवाय, मॅच्योरिटीवर गुंतवणुकदारांना बोनस दिला जाईल. एकूण 10 लाख रुपयांच्या या प्लॅनमध्ये अ‍ॅक्सिडेंटल डेथचाही कव्हर मिळतो.

First published:

Tags: LIC, Money