जाहिरात
मराठी बातम्या / मनी / झिरो रिस्कवर ओपन करा हे सुरक्षित अकाउंट, दर महिन्याला मिळतील 4950 रुपये

झिरो रिस्कवर ओपन करा हे सुरक्षित अकाउंट, दर महिन्याला मिळतील 4950 रुपये

झिरो रिस्कवर ओपन करा हे सुरक्षित अकाउंट, दर महिन्याला मिळतील 4950 रुपये

शेअर मार्केटमध्ये अधिक रिटर्न्स असले, तरी जोखीमही अधिक असते. त्यामुळे अनेकाचा याकडे कल कमी असतो. अशात तुम्ही चांगले रिटर्न्स आणि अतिशय सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 एप्रिल : तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसाठी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. शेअर मार्केटमध्ये अधिक रिटर्न्स असले, तरी जोखीमही अधिक असते. त्यामुळे अनेकाचा याकडे कल कमी असतो. अशात तुम्ही चांगले रिटर्न्स आणि अतिशय सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्किम एक अशीच चांगली (Post Office MIS) स्मॉल सेव्हिंग, सुरक्षित गुंतवणूक आहे. या योजनेत एकदाच पैसे जमा करावे लागतात. MIS अकाउंटचा मॅच्युरिटी पीरिएड 5 वर्षांचा असतो. म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला गॅरेंटीड मंथली इन्कम मिळू लागेल. पोस्ट ऑफिस स्किममध्ये (POMIS) सिंगल आणि जॉइंट दोन्ही प्रकारचे अकाउंट ओपन करता येतं. यात कमीत-कमी 1000 रुपये गुंतवणूक करुन अकाउंट ओपन करता येतं. सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमीत-कमी 4.5 लाख रुपये भरावे लागतील. तर जॉइंट अकाउंट असल्यास गुंतवणूक 9 लाख रुपये करावी लागेल.

हे वाचा -  रिटायरमेंटनंतर दर महिना मिळेल 22000 रुपये पेन्शन, काय आहे सरकारी योजना

MIS चे काय आहेत फायदे - - पोस्ट ऑफिसच्या या MIS स्किममध्ये दोन किंवा तीन लोक मिळूनही जॉइंट अकाउंट ओपन करू शकतात. - या अकाउंटमधून मिळणारी रक्कम प्रत्येक मेंबरला समान दिलं जातं. - जॉइंट अकाउंट असल्यास ते सिंगल अकाउंटमध्येही कन्वर्ट करता येतं. - सिंगल अकाउंटही जॉइंट अकाउंटमध्ये कन्वर्ट करता येतं. - अकाउंमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी सर्व अकाउंट मेंबर्सचं जॉइंट अॅप्लिकेशन द्यावं लागतं. - मॅच्युरिटी अर्थात पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढे 5-5 वर्ष वाढवताही येऊ शकतं. - MIS अकाउंटमध्ये नॉमिनेशनचीही सुविधा आहे. यात योजनेत पूर्ण पैसे सुरक्षित असतात. यावर सरकारची सॉवरेन गॅरेंटी असते. या अकाउंटचा कालावधी पाच वर्षांचा असतो. यात प्रीमॅच्योर क्लोजरही मिळतं. डिपॉजिटच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता. या योजनेनुसार, एक वर्ष ते तीन वर्षामध्ये पैसे काढल्यास डिपॉजिट अमाउंट 2 टक्के कापून दिली जाते. जर अकाउंट ओपन केल्यानंतर तीन वर्षांनंतर पण पाच वर्ष मॅच्युरिटीच्या आधी पैसे काढल्यास जमा रकमेवरील 1 टक्का कापून पैसे परत दिले जातात. इंडिया पोस्टच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मंथली इन्कम स्किमवर वर्षाला 6.6 टक्के व्याज मिळतं. याचं पेमेंट दर महिन्याला होतं. पोस्ट ऑफिसच्या या मंथली इन्कम स्किममध्ये कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात