Home /News /money /

रिटायरमेंटनंतर दर महिना मिळेल 22000 रुपये पेन्शन, काय आहे सरकारी योजना

रिटायरमेंटनंतर दर महिना मिळेल 22000 रुपये पेन्शन, काय आहे सरकारी योजना

नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. हा एक सुरक्षित पर्याय असून यात रिटर्न्सदेखील चांगले मिळतात.

  नवी दिल्ली, 16 एप्रिल : तुम्हाला रिटायरमेंटनंतरही पैशांच्या बाबतीत कोणतीही समस्या येऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी नोकरीत असतानाच काही गुंतवणूक करणं गरजेचं ठरतं. यासाठी नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (NPS) गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. हा एक सुरक्षित पर्याय असून यात रिटर्न्सदेखील चांगले मिळतात. त्यामुळेच अनेक सरकारी तसंच प्रायव्हेट सेक्टरशी संबंधित अनेक लोक नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात NPS मध्ये गुंतवणूक करतात. 2004 मध्ये ही योजना सुरू झाली होती. या स्कीममध्ये सर्वात आधी केवळ सरकारी कर्मचारी गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ही स्कीम सर्वांसाठी ओपन करण्यात आली. NPS मध्ये रिटारयमेंट आधी पैसे भरावे लागतात. रिटायरमेंटवेळी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकत्रित फंडचा काही भाग काढता येतो आणि उरलेले पैसे पेन्शन रुपात मिळतात. NPS मध्ये टॅक्सचाही फायदा मिळतो. जर तुम्ही नोकरदार असाल, तर सेक्शन 80सीसीडी (1बी) अंतर्गत तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणूक करून वार्षिक 50000 रुपयांची टॅक्स सूट मिळवू शकता. ही सूट 80सी अंतर्गत मिळणाऱ्या 150000 लाख रुपयांहून वेगळी आहे. कोण करू शकतं गुंतवणूक - 18 ते 65 वर्षांची कोणतीही व्यक्ती NPS मध्ये गुंतवणूक करू शकते. NPS मधील गुंतवणूक पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे (PFRDA) नियुक्त केलेल्या पेन्शन फंड मॅनेजरकडून व्यवस्थापित केलं जातात. PFRDA ही राष्ट्रीय पेन्शन योजनेची नियामक आहे. तुम्ही एकूण 7 पेन्शन फंड मॅनेजर्सपैकी कोणत्याही एकाची निवड करू शकता. पेन्शन फंडमध्ये 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक केली जाते. त्यानंतर एक NPS Annuity Plan घ्यावा लागतो. सहा Annuity Providers पैकी कोणताही एक Annuity Plan खरेदी करता येतो. Annuity Providers तुम्हाला दर महिन्याला पेन्शन देईल.

  हे वाचा - PPF मध्ये पैसे गुंतवा; सुरक्षित गुंतवणुकीसह बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षा जास्त परतावा मिळवा

  5000 रुपये गुंतवणूक - 30 वर्षांचा व्यक्ती दर महिन्याला 5000 रुपये NPS मध्ये गुंतवणूक करत असेल, तर तो रिटारयमेंटनंतर दर महिन्याला 22,279 रुपये पेन्शन मिळवू शकतो. 5000 रुपये वयाच्या 60 वर्षांपर्यंत दर महिन्याला जमा करावे लागतील. त्याशिवाय 45 लाख रुपये अशी एकत्रित रक्कम मिळेल. या रकमेसाठी वर्षाला 10 टक्के व्याज आणि सहा टक्के Annuity दर ठरवण्यात आला आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Open nps account, Savings and investments

  पुढील बातम्या