मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Post Office ही खास स्कीम खरेदी करून साजरी करा दिवाळी! मिळेल High Return आणि दरमहा होईल कमाई

Post Office ही खास स्कीम खरेदी करून साजरी करा दिवाळी! मिळेल High Return आणि दरमहा होईल कमाई

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमच्या नावाप्रमाणे तुम्ही दरमहा रिटर्न मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमच्या नावाप्रमाणे तुम्ही दरमहा रिटर्न मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या या स्कीमच्या नावाप्रमाणे तुम्ही दरमहा रिटर्न मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 04 नोव्हेंबर: दिवाळीच्या काळात (Diwali Shopping 2021) एखादी गुंतवणूक (Investment During Diwali) करण्याला पसंती दिली जाते. काहीजण घरासाठी गुंतवणूक करतात किंवा काहीजण वाहनांसाठी. अनेकदा घरात एखादी मोठी वस्तू देखील या काळात खरेदी केली जाते. मात्र तुम्हाला जर या दिवाळीत छोटी गुंतवणूक (Small Saving Schemes) करायची असेल तर तुम्ही छोट्या बचत योजनांचा विचार करू शकता. या छोट्या बचत योजनांमध्ये पोस्ट ऑफिसच्या (Best Post Office Small Saving Schemes) छोट्या बचत योजना (Best Post Office Schemes) कमी गुंतवणुकीच्या, विशेष फायद्याच्या, चांगल्या रिटर्न देणाऱ्या आणि कमी जोखमीच्या असतात. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम या पोस्ट ऑफिस स्कीमच्या नावाप्रमाणे तुम्ही दरमहा रिटर्न (Monthly Return) मिळवू शकता.

कमीतकमी किती करावी लागेल गुंतवणूक

पोस्ट ऑफिस एमआयएस स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) वैयक्तिक खातं उघडताना कमीत कमी 1000 रुपयांपासून गुंतवणुकीची सुरुवात करता येईल. या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाखांची गुंतवणूक करता येते. दरम्यान या योजनेत तुम्हाला सिंगल किंवा जॉइंट अकांउंट काढता येते. त्यामुळे जॉइंट अकाउंटसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाखांची आहे. यावर तुम्हाला दरमहा व्याज मिळेल. सध्या या स्कीममध्ये 6.6 टक्के दराने व्याज मिळते आहे.

पोस्टाच्या या मासिक उत्पन्न योजनेत सिंगल किंवा जॉइंट कुठल्याही प्रकारच्या अकाउंटमध्ये एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. तुमच्या खात्यात दरमहा किती रुपये जमा होणार हे या रकमेवर अवलंबून आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते ती नंतर 5 वर्षांच्या अंतराने वाढवता येते.

हे वाचा-Petrol-Diesel वरील उत्पादन शुल्क कमी, केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान

जाणून घ्या जॉइंट अकाउंटविषयी...

याआधी नमूद केल्याप्रमाणे तुम्ही या योजनेत सिंगल किंवा जॉइंट अकांउंट काढू शकता. जॉइंट अकाउंट काढताना तुम्ही दोन किंवा तीन जण मिळून हे खातं उघडू शकता. यामध्ये जे व्याजाचे पैसे मिळणार आहेत ते जॉइंट खात्यातील प्रत्येक व्यक्तीला समसमान वाटले जातात. तुम्हाला तुमचे सिंगल अकाउंट कधीही जॉइंटमध्ये बदली करून घ्यायचे असेल किंवा जॉइंट अकाउंट सिंगलमध्ये बदलून घ्यायचे असेल तरी ते शक्य आहे. या बदलासाठी अकाउंटच्या सर्व मेंबर्सची सही आवश्यक आहे.

हे वाचा-लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन

पैसे काढताना लक्षात ठेवा हे मुद्दे

>> तुम्ही या स्कीममधून जमा केलेले पैसे मॅच्युरिटीआधी देखील काढू शकता पण तेव्हा तुमच्या हातात काही रक्कम वजा होऊन पैसे येतील

>> खातं उघडल्यानंतर वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत

>> अकाउंट उघडल्यानंतर एक वर्ष ते तीन वर्षादरम्यान पैसे काढल्यास जमा रकमेतील 2 टक्के काढून पैसे दिले जातील

>> दरम्यान अकाउंट उघडल्याच्या तीन वर्षानंतर पण मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास जमा रकमेच्या 1 टक्के रक्कम कापली जाईल

First published:

Tags: Post office, Post office balance, Post office facility, Post office saving