Home /News /money /

Petrol-Diesel वरील उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर

Petrol-Diesel वरील उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्राचं होणार 1 लाख कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel rates Today) कपात होणार आहे. सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे.

    नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर: पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price) दरात भरमसाठ वाढ झाली आहे. पण आता ऐन दिवाळीच्या (diwali 2021) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel rates Today) कपात होणार आहे. सामान्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार असला तरीही केंद्र सरकारच्या तिजोरीवर यामुळे मोठा भार पडणार आहे. हे वाचा-कमाईची मोठी संधी! काय आहे NFT आणि कशाप्रकारे करतं काम? जाणून घ्या सर्वकाही दरमहा 8,700 कोटी रुपयांचे महसुलाचे होणार नुकसान एप्रिल-ऑक्टोबरमधील वापराच्या आकडेवारीवर आधारित, उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे सरकारच्या महसुलात दरमहा 8,700 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ऑइल इंडस्ट्रीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक आधारावर साधारण 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा परिणाम होईल. केंद्राच्या महसुलावर चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी 43,500 कोटी रुपयांचा परिणाम होईल. दरम्यान उत्पादन शुल्कातील कपात 4 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दिल्लीतील पेट्रोलची किंमत सध्याच्या (Petrol Price Today) 110.04 रुपये प्रति लीटरवरून 105.04 रुपये प्रति लीटरवर खाली येईल, तर डिझेलची किंमत (Diesel Price Today) प्रति लीटर 98.42 रुपयांवरून 88.42 रुपये प्रति लीटरवर येईल. उत्पादन शुल्कात आतापर्यंतची सर्वात मोठी कपात: एफएम अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कातील कपात 4 नोव्हेंबर 2021 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील. उत्पादन शुल्कातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कपात आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol

    पुढील बातम्या