Home /News /money /

पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची डेडलाइन वाढवली, 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा

पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची डेडलाइन वाढवली, 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा

नोकरीसाठी किमान शिक्षण 10वी आणि त्याचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 40 वर्ष असावं अशी अट आहे. ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाच्या नियमांत 5 वर्षांची सूट आहे.

नोकरीसाठी किमान शिक्षण 10वी आणि त्याचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 40 वर्ष असावं अशी अट आहे. ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाच्या नियमांत 5 वर्षांची सूट आहे.

पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा (Postal Life insurance and Rural Postal Life Insurance) प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका मीडिया अहवालात माहिती देण्यात आली आहे की, देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे हाहाकार माजला आहे. परिणामी पॉलिसीधारकांच्या समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दोन्ही योजनांच्या पॉलिसीधारकांना प्रीमियम भरण्यासाठी समस्या येत होती. दरम्यान अत्यावश्यक सेवांसाठी देशभरातील पोस्ट ऑफिस खुले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 13 लाख पॉलिसीधारकांचा फायदा होणार आहे. ं पेनल्टी लागणार नाही या दोन्ही योजनांच्या पॉलिसीधारकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. 30 जून 2020 पर्यंत त्यांना मार्च, एप्रिल, मे या महिन्यांचा प्रीमियम कधीही भरता येणार आहे. डायरेक्टोरेट ऑफ पोस्टल लाइफ इन्शुरन्सने हा निर्णय पॉलिसीधारकांच्या हितासाठी घेतला आहे. (हे वाचा-केंद्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यांसाठी COVID-19 इमरजन्सी पॅकेजला मंजूरी) तीनही महिन्यांच्या प्रीमियम जूनपर्यंत भरल्याने कोणतीही पेनल्टी अर्थांत दंड देखील बसणार नाही आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन पोस्टल सुविधांच्या माध्यमातून पॉलिसीधारक प्रीमियम भरू शकतात. 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा याआधी पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स भरण्याची तारीख 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता सरकारच्या या निर्णयानंतर या योजनेच्या 13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये 5.5 लाख पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसीधारक आहेत. तर 7.5 लाख रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सचे पॉलिसीधारक आहेत. (हे वाचा-लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला मोठा फटका) संपादन-जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या