मुंबई, 15 ऑगस्ट: पोस्ट ऑफिसमध्ये खातं (Post Office Account Holders) असल्यास किंवा कोणत्याही योजनेमध्ये (Post Office Scheme Benefits) तुम्ही पैसे गुंतवले असल्यास काही व्यवहारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काम पूर्ण करावे लागते. मात्र ज्येष्ठ नागरिकांना (Post Office Schemes for Senior Citizen) वयोमानामुळे ते शक्य होईलच असे नाही. अशावेळी पोस्ट ऑफिसने या नागरिकांना दिलासा दिला आहे. आतापर्यत पोस्ट ऑफिसमधील अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन, अकाउंट बंद करण्यासठी, प्रीमॅच्युअर विड्रॉल इ. कामांसाठी ज्येष्ठ नागरिकांना देखील पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागत असे. मात्र आता ज्येष्ठ नागरिकांचं हे काम कोणतीही अधिकृत व्यक्ती करू शकते. पोस्ट ऑफिसने सर्क्युलर जारी करत याबाबत माहिती दिली आहे. कोरोना काळात घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. कारण अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात महत्त्वाचे काम आल्यास स्वत: जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हे वाचा- EPFO खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी, हे काम पूर्ण नसल्यास अडकतील पैसे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांची पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची कामं एखादी अधिकृत व्यक्ती करू शकते. याकरता ज्येष्ठ नागरिकांना एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जाणून घ्या काय आहे प्रक्रिया »सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाऊन SB-12 हा फॉर्म भरावा लागेल. यातून तुम्ही एखाद्या अधिकृत व्यक्तीला विड्रॉल, लोन, क्लोजर, प्रीमॅच्युअर विड्रॉल इ. काम करण्यासाठी परवानगी देऊ शकता. हे खातं जॉइंट असल्यास अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी अटेस्ट करावी लागेल »अकाउंट होल्डरने योग्य फॉर्म भरणं आवश्यक आहे. कॅश विड्रॉलसाठी फॉर्म SB-7, खातं बंद करण्यासाठी फॉर्म SB-7B. शिवाय खातेधारक आणि अधिकृत करण्यात येणाऱ्या व्यक्तीचा सेल्फ अटेस्ट करण्यात आलेला फोटो आणि अॅड्रेस प्रूफ द्यावा लागेल. प्रत्येक व्यवहारासाठी एसबी-12 फॉर्म भरावा लागेल हे वाचा- 1 लाख रुपयांच्या Lucky Winnerचा मेसेज तुम्हालाही आलाय का? PNB ने जारी केला अलर्ट » अधिकृत करण्यात आलेल्या व्यक्तीला पासबुक आणि हा फॉर्म सबमिट करावा लागेल. याशिवाय त्यांना ट्रान्झॅक्शन फॉर्मसह (SB-7/SB-7B इ.) KYC कागदपत्र द्यावी लागतील. »यानंतर पोस्टातील कर्मचारी अधिकृत व्यक्तीने दिलेली कागदपत्र, खातेधारकाची स्वाक्षरी पडताळून पाहतील. त्यानंतर सुपरव्हायजरकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्यवहार पूर्ण केला जाईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.