मुंबई, 15 ऑगस्ट: पंजाब नॅशनल बँकेने (PNB-Punjab National Bank) ग्राहकांना फसवणुकीसंदर्भात एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने ग्राहकांना फिशिंग घोटाळ्यासंदर्भात सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तुम्ही PNB चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. काही फसवणूक करणारे ग्राहकांना लकी विनर असल्याचा मेसेज करत आहेत आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. तुम्ही अशा मेसेजमधील भुलथापांना बळी पडलात तर तुमचे पैसे लंपास होऊ शकतात. तुम्हालाही असा मेसेज आल्यास वेळीस सावध व्हा!
बँकेने ग्राहकांना दिली महत्त्वाची सूचना
देशातील सर्वच बँका त्यांच्या ग्राहकांना अशाप्रकारच्या बँकिंग फ्रॉडबाबत सूचना देत असतात. एसबीआय, आयसीआयसीआयसह आता पंजाब नॅशनल बँकेने देखील त्यांच्या कोट्यवधी ग्राहगांसाठी फसवणुकीपासून वाचण्यासाठी अलर्ट जारी केला आहे.
हे वाचा-PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील महिन्यापासून होणार हा बदल
लकी विनर असल्याचा मेसेज तुम्हालाही आला आहे का?
बँकेने अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या मेसेजबाबत ट्वीट करत म्हटले आहे की, 'तुम्हाला हे संशयास्पद वाटत नाही का? याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही कोणत्या लॉटरीमध्ये सहभागी झालात नाहीत तर तुम्ही जिंकू शकत नाही. अशाप्रकारे फसवणुकीचे मेसेज आल्यास https://cybercrime.gov.in वर तक्रार करा. सावध राहा'.
Isn’t something fishy?
The answer is if you haven’t participated in a lottery, you can’t win it. Report such incidents of fraudulent messages on https://t.co/qb66kLcXD4. Be mindful.#BeCyberSafe pic.twitter.com/p8qnR9piKD — Punjab National Bank (@pnbindia) August 14, 2021
काय येत आहे फ्रॉड्सचा मेसेज?
फ्रॉड करणारे असा मेसेज करत आहेत री, 'अभिनंदन तुम्ही आमच्या लकी कॉटेंस्टचे विजेते आहात, तुम्हाला बक्षीस म्हणून 1 रुपये दिले जात आहेत, या लिंकवर क्लिक करा.'
हे वाचा-Jandhan Account: केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स
बँक फ्रॉडपासून कसे वाचाल?
>> कुणाबरोबरही OTP, PIN, CVV, UPI PIN शेअर करू नका
>> फोनमध्ये बँकिंग संदर्भातील संवेदनशील माहिती सेव्ह करून ठेवू नका
>> एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती कुणाबरोबर शेअर करू नका
>>बँकेकडून तुमची वैयक्तिक माहिती विचारली जात नाही, असा कुणाचा फोन आल्यास समोरच्या व्यक्तीला अशी माहिती देऊ नका
>>ऑनलाइन पेमेंट करताना सावधानता बाळगा, कोणत्याही पब्लिक नेटवर्कमध्ये पेमेंट किंवा कोणतंही ट्रान्झॅक्शन करू नका
>>पडताळणी केल्याशिवाय कोणतंही सॉफ्टवेअर किंवा app डाऊनलोड करू नका
>>अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Online fraud, Pnb, Pnb bank