मुंबई, 11 फेब्रुवारी : शेअर बाजारातील घसरणीदरम्यान, पॉलिसीबाझार (PolicyBazaar) अर्थात पीबी फिनटेकचे (PB FIntech) शेअर्स शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात 10 टक्क्यांपर्यंत घसरले. NSE वर PB Fintech चे शेअर्स 28 रुपयांच्या घसरणीसह उघडले आणि 775 रुपयांपर्यंत खाली गेले. सध्या (दुपारी 12.45 वाजता) सुमारे 8 टक्क्यांच्या कमजोरीसह ते 796 रुपयांवर ट्रेड करत आहेत. सध्याची घसरण खरेदीची संधी? शेअर बाजार विश्लेषक या घसरणीला अल्प ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी खरेदीची संधी मानतात. शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, पॉलिसीबाझारच्या स्टॉकमध्ये जोरदार पुनरागमन होऊ शकते कारण त्याला पॉलिसी नूतनीकरणातून चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. ते म्हणाले की, अल्पावधीत हा स्टॉक 1000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. Life Insurance : पहिल्यांदा विमा पॉलिसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवाच, पाहा डिटेल्स 775 रुपयांवर चांगला सपोर्ट लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, पीबी फिनटेक स्टॉकला 775 रुपयांवर चांगला सपोर्ट आहे आणि डाउनसाइड ब्रेकआउटवर तो 720 ते 700 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे, पोझिशनल गुंतवणूकदारांनी काही काळ प्रतीक्षा करावी. स्टॉक क्लोजिंग बेसिसवर 850 रुपयांच्या वर गेल्यास लक्षणीय वाढ होऊ शकते. LIC IPO: संधीचं सोनं करण्यासाठी डिमॅट अकाऊंटमध्ये झपाट्याने वाढ; महिनाभरात 34 लाख नवे अकाऊंट ओपन ऑलटाईम हाय वरुन शेअर 50 टक्के कमी IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी म्हटलं की, पॉलिसीबझारचे शेअर 1470 रुपयांच्या लिस्टिंगनंतरच्या ऑलटाईम हायवरून जवळपास 50 टक्क्यांनी तुटले आहे. चालू तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे कारण आर्थिक वर्षाच्या शेवटी लाइफ आणि मेडिक्लेम पॉलिसींची मागणी सामान्यतः वाढू शकते. आम्ही अपेक्षा करू शकतो की स्टॉक सध्याच्या पातळीवरून बाउन्स बॅक होईल. त्याला 750-760 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. हाय रिस्क गुंतवणूकदार हा स्टॉक खरेदी करू शकतात कारण आम्हाला अपेक्षा आहे की अल्पावधीत शेअर 950-1000 रुपयांपर्यंत जाईल. चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले येण्याची अपेक्षा GCL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले की, कंपनीला चौथ्या तिमाहीतील मजबूत निकालांची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्याची घसरण ही खरेदीची चांगली संधी असू शकते. दीर्घ मुदतीसाठी, 1200 रुपयांच्या टार्गेटसाठी, ते सुमारे 750 ते 760 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.