नवी दिल्ली, 01 जून: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. 1 जूनपासून सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत (LPG Gas Cylinder Price) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. IOC ने 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या (LPG Price Today) किंमतीत दिलासा दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामध्ये ना कपात झाली आहे ना वाढ झाली आहे. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरचे दर याआधी मे महिन्यात कमी करण्यात आले होते.
IOC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, मुंबईमध्ये 1 जून रोजी 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 122.5 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर 19KG च्या गॅस सिलेंडरची मुंबईतील किंमत 1422.5 रुपये झाली आहे. मे मध्ये हा दर 1545 रुपये होता. मे मध्ये सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत 45.5 रुपयांनी कमी केली होती.
हे वाचा-तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम आजपासून बदलणार, वाचा सविस्तर
कमर्शिअल LPG गॅस सिलेंडरचे नवे दर
>> दिल्लीमध्ये 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1595.50 रुपयांवरून 1473.5 रुपये झाली आहे.
>> मुंबईमध्ये 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची नवीन किंमत 1545 रुपयांवरून 1422.5 रुपये झाली आहे.
>> कोलकातामध्ये 1667.50 रुपयांवरून 1544.5 रुपये झाली आहे.
>>चेन्नईमध्ये 1725.50 रुपयांवरून किंमत कमी होऊन 1603 रुपये झाली आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल नाही
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत या महिन्यातही कोणताच बदल झाला नाही आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आण चेन्नईमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत अनुक्रमे 809 रुपये, 809 रुपये, 835.5 रुपये, 825 रुपये आहे.
हे वाचा-EPFO च्या नियमात बदल, कोरोना उपचारासाठी देखील काढता येतील पैसे; वाचा सविस्तर
WhatsApp च्या माध्यमातून रिफिल करा गॅस सिलेंडर
इंडेन कंपनीचे ग्राहक 7718955555 या क्रमांकावर कॉल करून एलपीजी गॅस सिलेंडरचं बुकिंग करू शकतात. याशिवाय या ग्राहकांनी WhatsApp वर REFILL असं लिहून 7588888824 या क्रमांकावर पाठवलं तरीही सिलेंडर रिफिल करता येईल. याकरता तुमचा मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असणं आणि त्यावरुनच तुम्ही WhatsApp मेसेज करणं गरजेचं आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LPG Price