मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी उसळी, 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचलं सोनं तर चांदी 72 हजारांवर

Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी उसळी, 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचलं सोनं तर चांदी 72 हजारांवर

Gold-Silver Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी (1st June 2021) सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळते आहे. आज सोन्याची किंमत प्रति तोळा 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे तर चांदी देखील 72000 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 01 जून: महिन्याच्या पहिल्याच दिवशी (1st June 2021) सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold, Silver Price Today) मोठी उसळी पाहायला मिळते आहे. आज सोन्याची किंमत प्रति तोळा 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे तर चांदी देखील 72000 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) मंगळवारी सोन्यासह चांदीच्या किंमती देखील वाढल्या आहेत. जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट सोन्याचांदीचे दर.

गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची वाढ पाहायला मिळते आहे. मार्च महिन्यात सोन्याचे दर 44,000 रुपये प्रति तोळापेक्षाही कमी झाले होते.

इथे तपासा सोन्याचांदीचे नवे दर (Gold Silver Price Today, 1 June 2021)

-एमसीएक्सवर आज सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 49,450 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

-तर चांदीमध्ये 0.84 टक्क्यांच्या तेजीनंतर दर प्रति किलो 72,503 रुपयांवर पोहोचले आहेत.

-आधीच्या सत्रात सोन्यामध्ये 0.45 टक्के तर चांदीमध्ये 0.42 टक्क्यांची तेजी आली होती.

हे वाचा-Petrol Price: सामान्यांना झटका! एका महिन्यात पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक

काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर?

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर गेल्या पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत. स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,911.45 डॉलर प्रति औंस झाली आहे. चांदीची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढून 28.22 डॉलर प्रति औंस तर प्लॅटिनमच्या दरात 0.5 टक्क्याने वाढ होत दर  1,192.22 डॉलर झाले आहेत.

सोन्याच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता

तज्ज्ञांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे सोन्याच्या किंमती वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. कारण या काळात गुंतवणुकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचा-तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम आजपासून बदलणार, वाचा सविस्तर

का वाढले सोन्याचे दर?

एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये मजबुती आल्याने सोन्याच्या किंमती वाढल्या आहे. तर न्यूयॉर्क कमोडिडी एक्सचेंज कॉमेक्सवर स्पॉट गोल्डच्या किंमतीतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे देखील देशांतर्गत सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today