• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलमुळे आजही सामान्यांच्या खिशाला चाप, काय आहे लेटेस्ट दर?

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol diesel rate) आहेत. इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसतो आहे. जाणून घ्या काय आहे आजचा भाव

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर (Petrol diesel rate) आहेत. इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसतो आहे. मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. गुरुवारी सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात (Fuel Rate Today) कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे. या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. लवकरच स्वस्त होणार इंधन पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार योजना आखत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून 50 लाख बॅरल तेल काढण्याची योजना आखत आहे. हे वाचा-Latent View Analytics Share: गुंतवणूकदारांना लॉटरी, दोन दिवसात पैसे तिप्पट काय आहेत इंधनाचे दर (Petrol Diesel Price on 25th November 2021) >> दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर >> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर >> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर >> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर >> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लीटर दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. हे वाचा-हे आर्थिक काम करण्यासाठी केवळ 7 दिवस शिल्लक! बँकेत न जाता घरबसल्या करा पूर्ण अशाप्रकारे घरबसल्या तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: