मराठी बातम्या /बातम्या /मनी /Jandhan Account: केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स, सेव्ह करून हे क्रमांक

Jandhan Account: केवळ मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या जनधन खात्यातील बॅलन्स, सेव्ह करून हे क्रमांक

Jandhan Account: PM जनधन खात्याअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. ही खातं झिरो बॅलन्स खातं आहे. याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डासहित अनेक सुविधा मिळतात.

Jandhan Account: PM जनधन खात्याअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. ही खातं झिरो बॅलन्स खातं आहे. याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डासहित अनेक सुविधा मिळतात.

Jandhan Account: PM जनधन खात्याअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. ही खातं झिरो बॅलन्स खातं आहे. याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डासहित अनेक सुविधा मिळतात.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट: तुम्ही देखील जनधन खाते (Jan Dhan Bank Account) उघडले असेल तर तुम्ही केवळ एक मिस्ड कॉल देऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स (Check Jan dhan Balance via Missed Call)  तपासू शकता. शिवाय तुमचं जनधन खातं आधार कार्डशी लिंक (Link Aadhar with Jan Dhan) असणं आवश्यक आहे. PM जनधन खात्याअंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येत आहेत. ही खातं झिरो बॅलन्स खातं आहे. याशिवाय ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डासहित अनेक सुविधा मिळतात.

दोन पद्धतीने तपासा जनधन खात्यातील बॅलन्स

तुम्ही दोन पद्धतीने तुमच्या जनधन खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. एक म्हणजे मिस्ड कॉल देऊन आणि दुसरं म्हणजे PFMS पोर्टलच्या माध्यमातून खात्यातील बॅलन्स तपासता येईल

1. PFMS पोर्टलच्या माध्यमातून

PFMS पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी  https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर भेट द्यावी लागेल. याठिकाणी Know Your Payment वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा खातेक्रमांक प्रविष्ट करावा लागेल. तुम्हाला दोन वेळा खातेक्रमांक एंटर करावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स समजेल

हे वाचा-Jan Dhan Account: 6 कोटी जन धन खाती झाली निष्क्रिय, तुमचं खातं देखील आहे का?

2. मिस्ड कॉलच्या माध्यमातून

तुमचे जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जनधन खाते आहे तर तुम्ही खात्यातील बॅलन्स मिस्ड कॉलच्या माध्यमातून माहित करून घेऊ शकता. याकरता तुम्हाला 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुनच मिस्ड कॉल द्यावा लागेल.

हे वाचा-खूशखबर! जनधन खातेधारकांना मिळेल 1.3 लाख रुपयांचा फायदा, वाचा सविस्तर

अशाप्रकारे सुरू करा जनधन खातं

तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत भेट द्या. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.

First published:

Tags: Bank, Bank details, Money, Pradhan mantri jan dhan yojana