नवी दिल्ली, 19 डिसेंबर: पीएम शेतकरी सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Scheme) या योजनेतील सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी मध्यप्रदेशमध्ये शेतकरी संमेलनामध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याबद्दल सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी माहिती दिली की, माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी शेतकरी सन्मान निधीच्या पुढील हप्त्याची घोषणा करतील. म्हणजे 25 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.
जर तुमच्या स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending असं लिहलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की, सरकारने तुम्ही दिलेली माहिती कन्फर्म केली आहे. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील.याचप्रमाणे तुम्हाला Rft Signed by State Government असं स्टेटस दिसत असल्यास यातील RFT चा अर्थ असा होतो की Request For Transfer. अर्थात तुम्ही दिलेली माहिती तपासण्यात आली आहे आणि ती पुढे ट्रान्सफर करण्यात आली आहे. एकूणच काय लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.
अशाप्रकारे खात्यामध्ये ट्रान्सफर होतील पैसे
या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अप्लाय केल्यानंतर राज्य सरकारकडून तो अर्ज तुमचा रेव्हेन्यू रेकॉर्ड, आधार क्रमांक आणि बँक खाते तपासून व्हेरिफाय केला जातो. जोपर्यंत हे व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत. राज्य सरकारकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय करून झाल्यानंतर FTO जेनरेट केला जातो. त्यानंतर केंद्र सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करते.
(हे वाचा-कोरोना संकटकाळात या इंडस्ट्रीमध्ये मिळतील नोकऱ्या, 10 लाख लोकांना मिळेल रोजगार)
FTO चा फुल फॉर्म असा होतो की, Fund Transfer Order.याचा अर्थ असा होतो की, राज्य सरकारकडून लाभार्थीचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि इतर अन्य माहिती व्हेरिफाय करण्यात आली आहे. तुम्हाला पाठवण्यात येणारा हप्ता तयार आहे आणि सरकार द्वारे तुमच्या खात्यामध्ये पाठण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तुम्हाला योजनेची रक्कम न मिळाल्यास थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क
या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता.
पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261
(हे वाचा-Gold Price Today: तीन दिवसानंतर स्वस्त झालं सोनंचांदी, इथे तपासा लेटेस्ट दर)
पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606
पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109
ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in