Home /News /money /

कोरोना संकटकाळात या इंडस्ट्रीमध्ये मिळतील नोकऱ्या, 10 लाख लोकांना मिळेल रोजगार

कोरोना संकटकाळात या इंडस्ट्रीमध्ये मिळतील नोकऱ्या, 10 लाख लोकांना मिळेल रोजगार

2021 च्या सुरुवातीपर्यंत देशभरात 90 टक्के रेस्टॉरंट (Restaurant) डिजिटल मेन्यूची सुरुवात करतील. त्यामुळे या क्षेत्रातील कामकाज पुन्हा एकजा जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसाय, फूड इंडस्ट्रीला बसला. मात्र आता या क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर येते आहे. रेस्टॉरंट टेबल रिझर्व्हेशन सर्व्हिसेस कंपनी डाइनआउटच्या अहवालानुसार येणाऱ्या काळात इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 2021 च्या सुरुवातीपर्यंत देशभरातील 90 टक्के रेस्टॉरंट डिजिटल मेन्यूची व्यवस्था करतील. त्यामुळे या क्षेत्रातील कामकाज पुन्हा एकजा जोमाने सुरू होण्याची शक्यता आहे. डाइनआउट कंपनीच्या अहवालानुसार 2021 मध्ये रेस्टॉरंट इंडस्ट्री 10 लाख लोकांना रोजगार देईल. कंपनीची चीफ एग्झिक्यूटिव्ह अंकित मेहरोत्रा यांच्या मते कोव्हिड-19 (COVID-19) मुळे इंडस्ट्रीमध्ये बराच बदल झाला आहे. त्यांच्या मते ग्राहक आता रेस्टॉरंटमध्ये 'हेल्दी फूड्स'ना पसंती देत आहेत. तर अधिकतर पेमेंट कॉन्टॅक्टलेस किंवा डिजिटल झालं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, येणाऱ्या काळात रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये विशेष बदल पाहायला मिळतील. (हे वाचा-Gold Price Today: तीन दिवसानंतर स्वस्त झालं सोनंचांदी, इथे तपासा लेटेस्ट दर) कोरोना काळात मोठ्या संख्येने रेस्टॉरंट झाले होते बंद कोरोनाचं संकट आणि ते रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट इंडस्ट्रीवर अनेक निर्बंध आणण्यात आले होते. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांनी हॉटेल्समध्ये खाणं बंद केलं होतं. अशावेळी हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या स्टाफचा पगार देणंही मुश्कील झालं होतं. (हे वाचा-सरकारने जारी केला अलर्ट! या 6 वेबसाइटपासून राहा सावधान, अन्यथा बसेल लाखोंचा फटका) या परिस्थितीत काही हॉटेल्सना तर कायमंच टाळं लागलं आहे. रेस्टॉरंट इंडस्ट्रीशी संबंधित एक बॉडी NRAI च्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनमुळे देशभरातील 30 टक्के Restaurant आणि बार कायमचे बंद झाले आहेत. ऑनलाइन ऑर्डरला पसंती लॉकडाऊनमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरीला अनेकांनी पसंती दिली. अनेक रेस्टॉरंट मालकांनी अशी माहिती दिली आहे की लॉकडाऊननंतर ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण वाढले आहे. हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरीच  जेवण मागवून खाणं ग्राहकांना अधिक सुरक्षित वाटत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Job

    पुढील बातम्या