8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 2 हजार, तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर लगेच करा 'हे' काम

8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी 2 हजार, तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर लगेच करा 'हे' काम

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) देशातल्या साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले. या योजनेतला हा सहावा हफ्ता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज 1 लाख कोटी रुपयांच्या अ‍ॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड सुविधेची सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेनुसार (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) देशातल्या साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले. या योजनेतला हा सहावा हफ्ता आहे. यात आज (9 ऑगस्ट ) शेतकऱ्यांना 17 हजार कोटींचं वाटप करण्यात आले. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 75,000 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत. या योजनेची सुरुवात 1 डिसेंबर 2018 ला झाली होती. लॉकडाऊनच्या काळात योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली होती.

वाचा-SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा

Agriculture Infrastructure Fund ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी देशात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा देण्यावरही भर देण्यात येणार आहे.

वाचा-RBI ते सर्वात मोठे 5 निर्णय! ग्राहकांसाठी चेक आणि कर्जासंदर्भातील नियम बदलले

असा चेक करा बॅलन्स

बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्ही pmkisan.gov.in वेबसाइटवर संपर्क करू शकता. यासह, आपण मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला अपडेट मिळत राहिल. Google Play Store वरून तुम्ही हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. या अॅपमध्ये हप्ताची स्थिती देखील समजली जाईल.

वाचा-इंटरनेटशिवाय करू शकाल मोबाइल किंवा कार्ड पेमेंट, RBI ने केली ही घोषणा

तुम्हाला लाभ मिळाला नाही तर करा हे काम

खात्यात पैसे नसल्यास तुम्ही तुमच्या अकाऊंटंट आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घेऊ शकता. आपण PM-Kisan Helpline 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त आपण मंत्रालयाच्या या क्रमांकावर (011-23381092)

Published by: Priyanka Gawde
First published: August 9, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या