Home /News /money /

इंटरनेटशिवाय करू शकाल मोबाइल किंवा कार्ड पेमेंट, RBI ने केली ही घोषणा

इंटरनेटशिवाय करू शकाल मोबाइल किंवा कार्ड पेमेंट, RBI ने केली ही घोषणा

लवकरच आता कार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून ऑफलाइन म्हणजेच इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी याबाबत घोषणा केली.

    नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : अनेक वेळा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करताना पेमेंट रद्द होते. अनेक कारणांमुळे तुमचे पेमेंट फेल होऊ शकते. Internet connectivity ची कमतरता हे त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र लवकरच आता कार्ड आणि मोबाइलच्या माध्यमातून ऑफलाइन म्हणजेच इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गुरुवारी पायलट स्कीमवर ऑफलाइन अर्थात इंटरनेटशिवाय कार्ड किंवा मोबाइलच्या माध्यमातून छोट्या पेमेंट संबंधित पेमेंट स्कीमची (Offline Payment Through Cards) घोषणा केली आहे. ग्रामीण भागात डिजीटल पेमेंट ज्याठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी आहे, अशा ठिकाणी देखील डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचा या योजनेचा मानस आहे. विकासात्मक धोरणांबाबत बोलताना आरबीआयने अशी माहिती दिली की देशांतील केंद्रीय बँक इतर संस्थांना ऑफलाइन पेमेंट सुधारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी पायलट स्कीमअंतर्गत युजरचे हित, व्यवहारातील सुरक्षा इत्यादी बाबी लक्षात ठेवून ऑफलाइन पेमेंटच्या माध्यमातून छोट्या रकमेच्या पेमेंटबाबतचा हा प्रस्ताव आहे. (हे वाचा-आता तुमचा EMI झाला कमी! सरकारी बँकांनंतर या खाजगी बँकेचा ग्राहकांना दिलासा) यावेळी अशी माहिती देण्यात आली आहे की, लवकरच याबाबत आदेश जारी केले जातील. याकरता गाइडलाइन्स देखील जारी केल्या जातील, अशी माहित आरबीआयकडून देण्यात आली आहे. आरबीआयकडून अशी माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात इंटरनेट नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात असल्यामुळे अनेकदा पेमेंट रद्द होतात. यामुळे कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलचा वापर करून ऑफलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामुले डिजीटल व्यवहारांना चालना मिळेल. (हे वाचा-या ग्राहकांना बँकांमध्ये नाही उघडता येणार चालू खाते, RBI चा नवा आदेश) केंद्रीय बँकेने यावेळी अशी देखील माहिती दिली की,  Payment System Operators (PSOs) ना Online Dispute Resolution (ODR)लागू करावे लागेल. डिजीटल व्यवहार वाढल्यानंतर तक्रारी देखील वाढल्या आहेत. तक्रारींच्या निराकरणासाठी ही व्यवस्था नियमांवर आधारित आणि पारदर्शी असेल. कसे करेल काम? -अहवालांच्या मते पेमेंट कार्ड, वॉलेट किंवा मोबाइलसह कोणत्याही अन्य चॅनेलच्या माध्यमातून केले जाऊ शकते -पेमेंट remote or proximity मोडमध्ये केले जाईल (हे वाचा-नोकरीची चिंता असल्यास करू शकता हा व्यवसाय, पहिल्या दिवसापासून होईल चांगली कमाई) -कोणत्याही Additional Factor of Authentication (AFA)शिवाय हा व्यवहार ऑफर केला जाऊ शकतो. -या व्यवहाराची मर्यादा जास्तीत जास्त 200 रुपये असेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या