जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 125 Rupee Coin: 125 रुपयांचं खास नाणं जारी, कुठे आणि कशाप्रकारे खरेदी करता येईल?

125 Rupee Coin: 125 रुपयांचं खास नाणं जारी, कुठे आणि कशाप्रकारे खरेदी करता येईल?

125 Rupee Coin: 125 रुपयांचं खास नाणं जारी, कुठे आणि कशाप्रकारे खरेदी करता येईल?

125 Rupee Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 सप्टेंबर 2021 रोजी एक खास नाणं जारी केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी 1 सप्टेंबर 2021 रोजी  एक खास नाणं जारी केलं आहे. हे एक स्मारक नाणे (Commemorative Coin) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शयसनेस (International Society for Krishna Consciousness – ISKCON) चे संस्थापक  श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद (Srila Bhaktivedanta Swami Prabhupada) यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त हे नाणं जारी केलं आहे. इस्कॉन ‘हरे कृष्णा’ आंदोलनाच्या नावे देखील ओळखले जाते. पीएम मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे 125 रुपयांचं नाणं जारी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी प्रभुपाद (Swami Prabhupada) यांना एक अलौकिक कृष्णभक्त असे संबोधले आहे. ते एक महान देशभक्त असल्याचंही पीएम मोदी म्हणाले. हे वाचा- अवघ्या 15 हजारांत सुरू करा ही शेती अन् 3 महिन्यांत कमवा 3 लाख कुठे मिळेल 125 रुपयांच नाणं? जर तुम्हाला हे विशेष नाणे खरेदी करायचे असेल तर तुम्ही ते आरबीआय टांकसाळीमध्ये बुक करू शकता. फक्त रिझर्व्ह बँकेच्या मुंबई आणि कोलकातामधील टांकसाळीमधून अशी स्मारक नाणी जारी केली जातात. याचे संचालन सिक्योरिटीज प्रिंटिंग अँड करन्सी मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे केले जाते. या नाण्यांसाठी, महामंडळाच्या वेबसाइटवर एक अर्ज करावा लागेल, ज्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी तुम्ही RBI च्या साईटला भेट देऊ शकता. हे वाचा- इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार काय आहे या नाण्यांमध्ये खास? एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटनेच्या सन्मानार्थ अथवा आठवणीत ही विशेष नाणी जारी केली जातात. ही नाणी एकप्रकारे खास डिझाइन केलेली असतात. त्या संबंधित व्यक्तीला किंवा घटनेला लक्षात घेऊन या नाण्यांचे डिझाइन केले जाते. ऐतिहासिक स्मारकं, स्थळ, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, विशिष्ट प्रकारचे जीव आणि वनस्पती, परंपरा इ. च्या स्मरणार्थ देखील ही नाणी जारी केली जातात. पहिलं स्मारक नाणं 1964 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या सन्मानार्थ जारी करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात