मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Price Today: इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार

Petrol Price Today: इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप, मुंबईसह अनेक शहरात पेट्रोल शंभरीपार

Fuel Rates Today: सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे.

Fuel Rates Today: सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे.

Fuel Rates Today: सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे.

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: सरकारी तेल कंपनी IOCL ने जारी केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनुसार आज मुंबईत पेट्रोल 107.39 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे (Fuel Rates Today) नवे दर जारी केले जातात. पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर आज गुरुवारी स्थिर आहेत. बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर 15-15 पैशांनी उतरले होते. आज पुन्हा एकदा कोणताही बदल यामध्ये झालेला नाही. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर अद्यापही सामान्यांना न परवडणारेच आहेत. देशभरातील 19 राज्यात पेट्रोलचे दर अजूनही शंभरीपार आहेत. याचा परिणाम जीवनावश्यक गोष्टींच्या ट्रान्सपोर्टवर देखील होत असून त्यामुळे या गोष्टींमध्ये देखील दरवाढ होत आहे. ही दरवाढ सामान्यांच्या खिशाला चाप देणारी ठरत आहे.

हे वाचा-Gold Price Today: सोन्यामध्ये घसरण सुरूच, चांदी देखील 515 रुपयांनी झाली स्वस्त

अशाप्रकारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

हे वाचा-अर्थव्यवस्थेबाबत सुधारणेचे संकेत, ऑगस्टमध्ये GST Collection 1 लाख कोटींपार

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? (Petrol-Diesel Price on 2nd Sept 2021)

>> दिल्ली पेट्रोल 101.34 रुपये आणि डिझेल 88.77 रुपये प्रति लीटर

>> मुंबई पेट्रोल 107.39 रुपये आणि डिझेल 96.33 रुपये प्रति लीटर

>> चेन्नई पेट्रोल 99.08 रुपये आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लीटर

>> कोलकाता पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर

>> नोएडा पेट्रोल 98.65 रुपये आणि डिझेल 89.34 रुपये प्रति लीटर

>> जयपूर पेट्रोल 108.27 रुपये आणि डिझेल 97.91 रुपये प्रति लीटर

>> भोपाळ पेट्रोल 109.77 रुपये आणि डिझेल 97.57 रुपये प्रति लीटर

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price