मराठी बातम्या /बातम्या /मनी /औषधी वनस्पतीच्या शेतीतून करा तीन महिन्यांत 3 लाखांची कमाई; गुंतवणूक फक्त 15 हजार रुपये

औषधी वनस्पतीच्या शेतीतून करा तीन महिन्यांत 3 लाखांची कमाई; गुंतवणूक फक्त 15 हजार रुपये

वनौषधीची शेती करण्याचा व्यवसाय सध्या फायद्याचा ठरत आहे. त्यापासून औषधं तयार करणाऱ्या कंपन्या ते पीक विकत घेण्याची हमीही देतात.

वनौषधीची शेती करण्याचा व्यवसाय सध्या फायद्याचा ठरत आहे. त्यापासून औषधं तयार करणाऱ्या कंपन्या ते पीक विकत घेण्याची हमीही देतात.

वनौषधीची शेती करण्याचा व्यवसाय सध्या फायद्याचा ठरत आहे. त्यापासून औषधं तयार करणाऱ्या कंपन्या ते पीक विकत घेण्याची हमीही देतात.

  नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : नैसर्गिक वनौषधीचा (Natural Plants) वापर करून अनेक आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Medicines) आणि सौंदर्य प्रसाधने निर्माण केली जातात. भारतात पारंपरिक पद्धतीनं तयार करण्यात येणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची बाजारपेठ मोठी आहे. त्यात कच्चा माल किंवा मुख्य घटक असलेल्या अनेक नैसर्गिक वनौषधींची मागणी मोठी असते. त्यामुळे औषधी वनस्पतींची लागवड हा अनेक शेतकऱ्यांचा मोठा व्यवसाय आहे. या शेतीने अनेक शेतकऱ्यांना हात दिला आहे. आजकाल अनेक कंपन्या करारावर अशी औषधी वनस्पतीची शेती करण्याची संधी देत आहेत.

  या शेतीसाठी जमीन (Land) कमी लागते, तसंच खर्चही (Expense) कमी असतो. त्याचप्रमाणे या वनस्पती तयार होण्यासाठी लागणारा वेळही इतर पिकांच्या मानाने कमी असतो. यातून कमाई मात्र दीर्घकाळ करता येते. अशी शेती करण्यासाठी फक्त काही हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता असते, परंतु यातून लाखांमध्ये कमाई करता येते.

  तुळशी, आर्टेमिसिया अॅनुआ, ज्येष्ठमध, कोरफड इत्यादी औषधी वनस्पतींची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे भारतात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांचा वापर विविध आजारांवरील गुणकारी औषधांमध्ये केला जातो.

  बिनधास्त ठेवा 'इतके' Savings Accounts येणार नाही इनकम टॅक्सची नोटीस; जाणून घ्या Details

  तुळशीची शेती :

  तुळशीचं (Basil) महत्त्व तर आपल्या देशात प्राचीन काळापासून ज्ञात आहे. घराघरात तुळस लावली जाते. तिची पूजा केली जाते. घरगुती औषधांमध्ये तुळशीचा वापर प्रामुख्यानं केला जातो. खोकला, सर्दी, श्वसनाचे आजार यावरच नव्हे तर कर्करोगावरही (Cancer) तुळस गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. युजेनॉल आणि मिथाइल सिनामेट असलेल्या तुळशीचा वापर कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील औषधे बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर तुळशीची मागणी वाढली आहे. तुळशीच्या बिया (Basil Seeds) आणि तेलाची (Oil) बाजारपेठही मोठी आहे. तुळशीचे बियाणे आणि तेल यांच्या दरात रोज चढ-उतार होत असते. दररोज नवीन दराने ही उत्पादने विकली जातात.

  पतंजली, डाबर, वैद्यनाथ इत्यादी आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्या तुळशीची कंत्राटी शेती करून घेत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांना तुळशीची शेती करण्यासाठी बियाणे, अन्य आवश्यक मदतीसह पीक खरेदीची हमीही देतात. एका हेक्टरवर तुळस पिकवण्यासाठी फक्त 15 हजार रुपये खर्च येतो, परंतु 3 महिन्यांनंतर हे पीक सुमारे 3 लाख रुपयांना विकले जाते. याची मागणी तर सातत्याने होतच असते त्यामुळे कमाईही कायम होत राहणार याची हमी असते.

  SBI खातं ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर सावधान! अकाउंट रिकामं होण्याची भीती

  प्रशिक्षण आवश्यक :

  औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी, चांगले प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. ज्यामुळे फसवणूक होणार नाही. लखनौस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमेटिक प्लांट (CIMAP) या वनस्पतींच्या लागवडीसाठी प्रशिक्षण देते. या संस्थेच्या माध्यमातून फार्मास्युटिकल कंपन्या (Pharma Companies) तुमच्याशी करार करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्पादनासाठी खरेदीदार शोधण्यासाठी फिरण्याची गरज नाही. अगदी माफक खर्चात तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता.

  First published: