• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत नवे दर

Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत नवे दर

Gold Silver Price, 25 November 2020: देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर आज किरकोळ प्रमाणात किंमती वाढल्याचे आढळून आले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतीत मंगळवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) किरकोळ वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 45 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. तर चांदीचे दर आज देखील (Silver Price Today) कमी झाले आहेत. एक किलो चांदीच्या किंमतीत 407 रुपयांची घसरण झाली आहे. मंगळवारी (Gold Rates on 24th November 2020) दिल्लीतील सराफा बाजार बंद होताना सोन्याचे दर 48,228 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते, तर चांदीचे दर  58,973 रुपये प्रति किलो वर होते. मंगळवारी दिल्लीमध्ये प्रति तोळा सोन्याचे दर 1049 रुपयांनी तर चांदीचे दर प्रति किलो 1588 रुपयांनी कमी झाले होते. सोन्याचे आजचे भाव (Gold Price, 25 November 2020) दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 45 रुपये प्रति तोळाने वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,273 रुपये प्रति तोळा झाले आहेत.  याआधीच्या सत्रात दर 48,228 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,812 डॉलर प्रति औंस झाले आहेत. (हे वाचा-तुमच्याकडे असणाऱ्या सोन्याची विक्री करण्याचा विचार करताय? द्यावा लागेल कर) चांदीचे आजचे भाव  (Silver Price, 25 November 2020) चांदीच्या किंमतीमध्ये आज देखील घसरण पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 07 रुपये प्रति किलोने उतरली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 59,380 रुपये झाले आहेत.  आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 23.34 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-PM मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत 3 मोठे निर्णय, सामान्यांवर होणार थेट परिणाम) का वाढत आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते गुंतवणुकदारांकडून खरेदीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये काम सुरू केल्यानंतर प्रोत्साहन पॅकेजसंदर्भात वाढलेल्या अपेक्षेमुळे मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये वाढ झाली.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: