जाहिरात
मराठी बातम्या / मनी / घरबसल्या जनधन खातेधारकांना होणार मोठा फायदा, पाहा काय स्कीम

घरबसल्या जनधन खातेधारकांना होणार मोठा फायदा, पाहा काय स्कीम

जनधन खातेधारकांसाठी गुडन्यूड

जनधन खातेधारकांसाठी गुडन्यूड

जनधन खातेधारकांना घरबसल्या पैसे कमावण्याची संधी, आकर्षक योजनांमधून मिळणार बक्कळ पैसे, वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: पंतप्रधान जनधन खात्यावर अनेक सुविधा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. अगदी ज्या बँक जनधन खातं आहे तिथे अपघात विमा 2 लाख रुपयांपर्यंत दिला जातो. याशिवाय शून्य खात्यावर कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अशा अनेक सुविधा असताना आता आणखी या खात्यावरील ग्राहकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत. केंद्र सरकारने जनधन खातेधारकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. CNBC आवाज ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान जनधन योजनेशी (पीएमजेडीवाय) संबंधित ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँका पीएमजेडीवाय खातेधारकांसाठी स्वतंत्र योजना आणू शकतात. गुंतवणुकीशी संबंधित या आकर्षक योजना असतील. या योजनांच्या माध्यमातून बँकांमध्ये जमा झालेल्या सुमारे १.७६ हजार कोटीमुळे खातेदारांना चांगले रिटर्न्स मिळतील शिवाय त्याचा फायदा बँकांनाही होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक खातेदारांना पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत सोने, म्युच्युअल फंड आणि एफडीसारख्या सुरक्षित योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे? कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?

गरजू आणि गोरगरीब जनतेला बँका उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान जनधन योजना सुरू केली. आता सरकार या खातेदारांसाठी नव्या योजना आणण्याच्या तयारीत आहे. या योजनांचा लाभ घसबलल्या खातेदारांना घेता येणार आहे. खातेदारांना गुंतवणुकीवर चांगले रिटर्न मिळतील. शिवाय सरकारलाही फायदा होईल. आकर्षक स्कीमच्या तयारीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजेच सरकारी बँका जनधन खातेधारकांसाठी सुरक्षित गुंतवणूक योजना आणू शकतात. जनधन खात्यांमध्ये सुमारे १.७६ हजार कोटी रुपये जमा आहेत.

कोणत्याही बँकेत खातं असेल तर 2 लाखांपर्यंत होणार फायदा, बस्स करा ‘हे’ काम
News18लोकमत
News18लोकमत

गुंतवणूक योजनेत सोने, एसआयपी आणि एफडीसारखे पर्याय दिलं जाऊ शकतो याबाबत सध्या विचार सुरू आहे. सर्वसामान्य खातेदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी बँकांची असेल अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यामुळे याबाबत घोषणा कधी होणार याकडे लक्ष असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात