मराठी बातम्या /बातम्या /मनी /

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे? कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे? कोणाला मिळणार या योजनेचा लाभ?

 पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.

पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.

पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थी, महिला-मुली आणि इतर नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. बीपीएल कुटुंबासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. त्यापैकी काही योजना तर अजूनही नागरिकांना माहिती नाही. लहान मुलं जन्माला आल्यानंतर सरकार आईला म्हणजेच जन्म देणाऱ्या महिलेला पैसे देतं. ही योजना नेमकी काय आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकतं जाणून घेऊया.

योजनेची सुरुवात कधी झाली?

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणली आहे. याअंतर्गत 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली होती. पहिल्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो. अशा महिलांना सरकार आर्थिक मदत करतं. ‘प्रधान मंत्री गर्भावस्था सहायता योजनेंतर्गत या महिलांना विशेष मदत दिली जाते.

कोणाला घेता येणार लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आणि तिच्या पतीकडे आधार कार्ड, बँक पासबुक फोटो स्टॅम्पसह असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा गर्भधारणा आणि रजिस्ट्रेशनही आवश्यक आहे. बँक खातं जॉइंट असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलेचं खातं वेगळं असायला हवं. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये 5000 रुपयांची रक्कम देण्यात येते.

children's day scheme : मुलीचं शिक्षण असो किंवा लग्न टेन्शन नाही, सरकारच्या या योजनेत आजच ठेवा पैसे

पैसे थेट महिलांच्या खात्यात

महिलांना उत्तम पोषण मिळावं हा योजनेमागचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात 1000 रुपये दुसऱ्या टप्प्यात 2 आणि तिसऱ्या टप्प्यात 2 हजार रुपये खात्यावर जमा केले जातात. सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. याशिवाय कोणतीही रक्कम हाती दिली जात नाही. थेट महिलेच्या खात्यावर जमा होते.

कसा करायचा अर्ज

आशा किंवा एएनएमच्या माध्यमातून पीएम मातृत्त्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. या योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जातो. प्रसूती सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये झाली तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

First published:

Tags: Children Day, Investment, Modi government, Money, Pm modi