मुंबई : तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. तुमचाही विश्वास बसत नाही पण हे खरं आहे. अनेकांना याबाबत खरी माहिती नसते. आम्ही तुम्हाला हा लाभ कुणाला आणि कसा मिळणार याची माहिती देणार आहोत. तुमचंही बँकेत खातं असेल तर तुम्ही 2 लाख रुपयांचा फायदा फुकटात घेऊ शकता. बँकेकडून जनधन ग्राहकांना ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विम्यासाठी संरक्षण देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो. याशिवाय फायनांशियल सर्व्हिस, बँकिंग बचत,क्रेडिट, विमा आणि पेन्शन अशा अनेक सुविधा ग्राहकांसाठी आहेत. जनधन खात्याचे फायदे - ६ महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा - २ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कव्हर - ३० हजार रुपयांपर्यंत लाइफ इन्शुरन्स कव्हर, लाभार्थीच्या मृत्यूनंतर अटी आणि शर्थी पूर्ण करणाऱ्याला ते पैसे मिळतात. - डिपॉझिटवर व्याज मिळतात - खात्यासह मोफत मोबाइल बँकिंगची सुविधाही दिली जाते. - जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तीला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जेणेकरून त्याला खात्यातून पैसे काढता येतील किंवा खरेदी करता येईल. - जनधन खात्याद्वारे विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे. - जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रम योगी मानधनसारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल. - देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा - सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे थेट खात्यात येतात. असं सुरू करा खातं जर तुम्हाला तुमचं नवं जनधन खातं उघडायचं असेल तर जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही अगदी सहज उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये नाव, मोबाइल क्रमांक, बँक शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/रोजगार व वार्षिक उत्पन्न व आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, पीन कोड अशी सगळी माहिती द्यायची आहे.
ट्रान्सफर करण्याचाही पर्याय बेसिक सेव्हिंग खातं तुम्हाला जनधन योजनेत ट्रान्सफर करायचा पर्यायही आहे. जनधन योजनेत ज्याचं खातं आहे त्यांना रुपे कार्ड मिळतं. 2018 पर्यत या खात्यावर विम्यासाठी रक्कम 1 लाख रुपये होती. आता ती वाढून 2 लाख रुपये झाली आहे. अपघाती विम्याचा लाभ ग्राहकांना या खात्यावर मिळणार आहे.