मराठी बातम्या /बातम्या /मनी /पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक चिंतेत, PM मोदींनी सांगितला दर कमी करण्याचा फॉर्म्यूला

पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक चिंतेत, PM मोदींनी सांगितला दर कमी करण्याचा फॉर्म्यूला

मागील कित्येक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डीजेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीवर सरकारने योग्य उपाय काढावा अशी अपेक्षा सामान्यांना आहे. दरम्यान PM नरेंद्र मोदींनी यावर एक उपाय सुचवला आहे

मागील कित्येक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डीजेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीवर सरकारने योग्य उपाय काढावा अशी अपेक्षा सामान्यांना आहे. दरम्यान PM नरेंद्र मोदींनी यावर एक उपाय सुचवला आहे

मागील कित्येक महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डीजेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीवर सरकारने योग्य उपाय काढावा अशी अपेक्षा सामान्यांना आहे. दरम्यान PM नरेंद्र मोदींनी यावर एक उपाय सुचवला आहे

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी: इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. दिवसेंदिवस हे दर रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर वाढले आहेत त्यामुळे देशातील पेट्रोलचा दर प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात केलेली कपात मागे घ्यावी अशी विनंती भारताने केली आहे. दिवसेंदिवस इंधनदर वाढतच आहेत. ही दरवाढ कमी करण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. मध्यम वर्गातील लोकांची चिंता सरकारला आहे त्यामुळे आम्ही इंधनात इथेनॉलचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. या आधीच्या सरकारने इंधन आयातीच्या प्रमाणात कपात केली असती तर आज देश परदेशी इंधनावर इतका अवलंबून राहिला नसता,’ असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केलं.

दरवाढ का झाली?

इंधन उत्पादक देश सौदी अरेबियाने (Saudi Arabia) फेब्रुवारी आणि मार्च 2021 मध्ये दररोजच्या इंधन उत्पादनात 10 लाख बॅरल उत्पादन कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून त्याचा विपरित परिणाम विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. तेल निर्यातक देशांची संघटना (OPEC) ओपेक आणि रशियासह इतर देशआंशी झालेल्या करारमुळे सौदी अरेबियाने इंधन उत्पादन काम करण्यचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक बॅरल खनिज तेलाची किंमत 63 डॉलर इतकी झाली असून हा वर्षातील उच्चांकी दर आहे. परिणामी भारतात एक लीटर किरकोळ इंधनासाठी सामान्य माणसाला 100 रुपये मोजावे लागत आहेत.

(हे वाचा-दरमहा 5000 रुपये गुंतवून मिळवा एकरकमी 68.37 लाख! या बँकेची खास योजना)

विकसनशील देशांच्या आर्थिक विकासात अडथळा

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाला विनंती केली आहे की त्यांनी कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवावं. उर्जा या विषयाशी संबंधित 11 व्या आयईए आयईएफ (IEA IEF) ओपेक विषयी चर्चासत्रात प्रधान म्हणाले, ‘कच्च्या तेलांच्या किमती वाढल्याने मागणी कमी झाली आहे आणि त्याचा वाईट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. भारतानी अनेक पद्धतीने महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण कच्च्या तेलाच्या दरांमुळे वाढणाऱ्या महागाईला सरकार काहीही करू शकत नाही. या किमतींचा फटका सामान्य भारतीय इंधन ग्राहकाला बसत आहे त्यामुळे मागणीही घटली आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका फक्त भारतालाच नाही तर सर्व विकसनशील देशांना बसला आहे.’

(हे वाचा -  काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुफान राडा; मारहाणीचा धक्कादायक VIDEO आला समोर)

पंतप्रधान मोदींनी सुचवला पर्याय

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवणं शक्य नसलं तरीही भारत दरवाढ कमी करण्यासाठी उपाय करू शकतो. याबाबत मोदी म्हणाले, ‘2019-20 या आर्थिक वर्षात आपण देशाच्या गरजेच्या 85 टक्के कच्चं तेल आयात केलं आहे. त्या तुलनेत केवळ 53 टक्के गॅस आयात केला आहे. इंधन आयात कमी करण्यासाठी या आधीच्या सरकारांनी प्रयत्न केले असते तर आज सामान्य माणसावर इंधन दरवाढीचा बोजा पडला नसता. आम्हाला देशातील मध्यमवर्गाची चिंता आहे. त्यामुळे उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा वापर इंधनात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जेणेकरून आयात कमी होईल आणि उर्जेसाठी आपण आयातीवर कमी अवलंबून राहू. उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलमुळे शेतकऱ्यालाही उत्पन्नाचा एक स्रोत मिळेल. अक्षय्य उर्जा या विषयातही सरकार काम करत आहे. 2030 पर्यंत देशातील एकूण उर्जा निर्मितीत अक्षय्य उर्जेचा वाटा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.’

First published:
top videos

    Tags: BJP, India, Modi government, Money, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Pm narendra mdi, Saudi arabia