कुणाला करता येईल गुंतवणूक? नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये 18 ते 60 वर्ष वयापर्यंत गुंतवणूक करता येते. देशातील जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये या योजनेत खाते उघडता येईल. मॅच्युरिटीआधीही काढता येईल रक्कम एनपीएस योजनेमध्ये तुम्ही काही परिस्थितींमध्ये प्री-मॅच्युअर देखील पैसे काढू शकता. जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल किंवा घर खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही पैसे आधी काढू शकता. याशिवाय लग्न, मुलांचं शिक्षण आणि लिस्टेट आजारपणासाठी देखील पैसे काढू शकता. काय आहे नॅशनल पेन्शन स्कीम? नॅशनल पेन्शन स्कीम एक सरकारी रिटायमेंट फंड योजना आहे. 2004 मध्ये केंद्र सरकारने ही योजना लाँच केली होती. 2009 मध्ये ही योजना खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी देखील लागू करण्यात आली. कसे मिळतील 68 लाख रुपये? जर तुम्ही 30 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केलीत तर तीस वर्षात तुमचे एकूण योगदान 18 लाख रुपये होईल. त्यामुळे जर या गुंतवणुकीवर तुम्हाला 10 टक्के दराने रिटर्न मिळाला तर मॅच्युरिटीवेळी मिळणारी एकूण रक्कम 1.13 कोटी असेल. >> अॅन्युइटी खरेदी - 40 टक्के >> अनुमानित अॅन्युइटी रेट - 8% >> टॅक्स फ्री विड्रॉल- मॅच्युरिटी रकमेच्या 60% >> वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्तीवेतन - दरमहा 30,391 रुपये >> एकरकमी रोख - 68.37 लाख रुपये https://www.pnbindia.in/nps.html या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही स्कीमविषयी अधिक माहिती मिळवू शकता.Invest in your happiness with #NPS!
Open an NPS account through #PNB & get better returns. Know more: https://t.co/4F460VYYlH pic.twitter.com/1oCKH0ZvYk — Punjab National Bank (@pnbindia) February 16, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Open nps account, Pension, Pension funds, Punjab national bank