मराठी बातम्या /बातम्या /देश /काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुफान राडा; मारहाणीचा धक्कादायक VIDEO आला समोर

काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तुफान राडा; मारहाणीचा धक्कादायक VIDEO आला समोर

 काँग्रेस कार्यालयातून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे

काँग्रेस कार्यालयातून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे

काँग्रेस कार्यालयातून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे

भोपाळ, 18 फेब्रुवारी : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) काँग्रेस कार्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली. त्याचं झालं असं की, गुरुवारी काँग्रेस कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी भोपाळ बंदच्या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेता पीसी शर्मा, माजी महापौर विभा पटेल सह अनेक नेते उपस्थित होते. यादरम्यान काही गोष्टीवरुन माजी महापौर विभा पटेल यांचे समर्थक धर्मेंद्र राय आणि एक अन्य कार्यकर्त्यांमध्ये मारहाण सुरू झाली. मारहाणीचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. यामध्ये स्पष्ट पाहू शकता की, कशा प्रकारे कार्यकर्ता एकमेकांना मारहाण करीत आहे.

मारहाणीचा एक व्हिडिओ आला समोर

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कार्यकर्ते एकमेकांशा शिव्या देत आहे आणि मारहाण करीत आहे. या घटनेनंतर तातडीने तेथील मीडिया कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर पाठविण्यात आलं. आणि अशा प्रकारचं कव्हरेज करण्यापासून रोखलं. लवकरच मध्य प्रदेशात पालिका निवडणुका होणार आहेत. अशात प्रदेशातील दोन प्रमुख पक्षांची निवडणुकीची तयारी सुरू आहे.

हे ही वाचा-राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पोलीस निरीक्षकाला भोवले, पाहा हा VIDEO

हे ही वाचा-राम मंदिर निधी संकलनाच्या रॅलीत नाचणे पोलीस निरीक्षकाला भोवले, पाहा हा VIDEO

ही काही पहिली वेळ नाही, जेव्हा काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली आहे. एका महिन्यापूर्वी मंदसोर काँग्रेस कार्यालयातदेखील असाच प्रकार समोर आला होता. येथेही काही कारणावरुन पक्षातील दोन गटांमध्ये मारहाण झाली होती. दोन्ही गटांमध्ये मारहाण आणि शिवीगाळ झाली होती. हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करणारे माजी काँग्रेस अध्यक्ष खलील शेख आणि काँग्रेस नेता सोमील हे जखमी झाले होते.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Congress, Madhya pradesh, Rahul gandhi, Violence