मुंबई : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे होळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज तेरावा हप्ता जमा होणार आहे. तेराव्या हप्ताची शेतकरी आतूरतेनं वाट पाहात आहेत. ह्या हप्त्याला उशीर झाला आहे. आज 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर मोदी सरकारकडून 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. देशातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज अखेर संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी PM किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करणार आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार की तुमच्या खात्यावर पैसे येणार की नाही याबाबत देखील तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे.
केंद्र सरकारने बदलला नियम, पाहा आता कोणाला मिळणार PM किसानचा लाभपीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये त्यांच्या खात्यावर 3 हप्त्यामध्ये दिले जातात. वर्षाला एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. आतापर्यंत या योजनेला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
एका अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी कर्नाटकातील बेळगाव इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पीएम-किसान योजनेचा 13 व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. पीएम किसान आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थ्यांसह सुमारे एक लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषी सचिव मनोज आहुजा उपस्थित राहणार आहेत.
PM Kisan Yojana: तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही कसं तपासायचं?तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लाभ मिळणार की नाही ते चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर भेट द्यायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक करा.
PM Kisan Samman Nidhi: अरे देवा! ‘या’ शेतकऱ्यांना सरकारला परत करावे लागणार पैसे ‘फर्मार कॉर्नर’ मधील लाभार्थी यादीवर क्लिक करा. तुमचे राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव एक एक करून निवडा. आता ‘Get Report’ वर क्लिक करा. यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.