मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे पीएम किसान निधी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 12 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. शेतकरी आता १३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एक मोठी अपडेट समोर आली आहे. असे काही शेतकरी आहेत ज्यांनी बोगसगिरी करून पीएम किसान सन्मान निधीचे पैसे हडप केले आहेत. अशा शेतकऱ्याकडून सरकार पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे. अपात्र शेतकऱ्यांना आता पैसे परत करावे लागणार आहेत. जर पैसे प्रामाणिकपणे परत केले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६,००० रुपये दिले जातात. शेतकऱ्यांचे हे पैसे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये आहे. साधारणतः पीएम किसान सन्मान निधीचा पीएम पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च या कालावधीत देण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेनुसार पती-पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. याशिवाय शेतकरी कुटुंबात कोणी कर भरला तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. गेल्या वर्षी पती-पत्नींपैकी कुणीही आयकर भरला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर जर एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडून जमीन घेऊन ती भाड्याने शेती केली, तर अशा परिस्थितीत त्यालाही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पीएम किसानमध्ये जमिनीची मालकी आवश्यक शेतकऱ्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकरी किंवा कुटुंबातील कोणी संवैधानिक पदावर असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. या शेतकऱ्यांनाही मिळणार नाही लाभ डॉक्टर, इंजिनीअर, सीए, आर्किटेक्ट, वकील अशा व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. शेती केली तरी चालेल, यासोबतच १० हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार नाही. आता हे कसं शोधायचं की कोणी पैसे रिटर्न करायचं? जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला योजनेचे पैसे परत करावे लागतील की नाही. त्यासाठी pmkisan.gov.in ऑफिशियल पोर्टलवर जावं लागेल. यानंतर उजव्या बाजूला तळाशी ‘रिफंड ऑनलाइन’चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. तर तुमच्याकडे दोन पर्याय असतील. आधीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करावं लागेल. जेव्हा तुम्ही योजनेचे पैसे परत केले असतील. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा बँक खाते क्रमांक अपलोड करावा लागेल.
यानंतर स्क्रीनवर दिलेला मजकूर लिहून गेट डेटावर क्लिक करावं लागेल. मग स्क्रीनवर ‘तुम्ही कोणत्याही रिफंड अमाउंटसाठी पात्र नाही’ असा मेसेज आला तर, म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. पण इथे जर रिफंड दिसत असेल तर ते म्हणजे हे पैसे तुम्हाला परत करावे लागतील. याचे कारण म्हणजे तुम्ही अपात्र आहात.