मुंबई : पीएम किसान योजना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यात बारावा हप्ता उशिरा आला. आता तेरावा हप्ता डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी चर्चा होती. मात्र अजूनही हा जमा झालेला नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता कधी जमा होतो या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. केंद्र सरकारकडून चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये हा हप्ता दिला जातो. आतापर्यंत या योजनेत 12 हप्ते देण्यात आले आहेत. तुम्हीही या योजनेची आतुरतेने वाट पाहत तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते आताच तपासून पाहा. यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmkisan पोर्टलवर लॉगइन करावं लागेल. तिथे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. याशिवाय तुमच्या आजूबाजूच्या गावातील लोकांचीही नावं तुम्हाला पाहता येणार आहेत. दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांची नावं तुम्ही तपासू शकता.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एक मिस्ड कॉल आणि झटक्यात मिळणार Loanतुम्ही जर आताच अर्ज केला असेल तर तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही ते तपासणं आवश्यक आहे. तुमचं या लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही. तुमचं नाव या लिस्टमध्ये का नाही हे देखील तुम्ही तपासून घ्या. सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in वेबसाईटवर जावं लागेल. तिथे तुम्हाला लाभार्थी असा एक पर्याय दिसेल तिथे, त्यावर क्लीक करा. लाभार्थी यादीवर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल. या पानावर जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक व गाव या नावांची माहिती द्यावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर यादी दिसेल, जिथे तुम्ही गावात तुमचे किंवा कोणाचेही नाव तपासू शकता.
Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक कामसरकार लवकरच पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता जारी करू शकते. या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता ईकेवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.