मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM-Kisan Scheme: काहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये

PM-Kisan Scheme: काहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Kisan योजनेची रक्कम आज हस्तांतरित करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काहीच वेळात या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Kisan योजनेची रक्कम आज हस्तांतरित करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काहीच वेळात या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Kisan योजनेची रक्कम आज हस्तांतरित करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काहीच वेळात या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 मे: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभार्थी असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्थात 14 मे रोजी मोदी सरकार (Modi Government) या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहे. 14 मे रोजी 11 वाजता ही ही रक्कम पाठवली जाणार असल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ही रक्कम हस्तांतरित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काहीच वेळात या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत.

ट्वीट करुन दिली माहिती

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी असं ट्वीट केलं आहे की, 'पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मो 2020 रोजी सकाळी PM Kisan योजनेअंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याच्या स्वरुपात 19000 कोटींची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून हस्तांतरित करतील.' या लाइव्ह इव्हेंटची लिंक देखील तोमर यांनी या ट्वीटमध्ये शेअर केली आहे. pmevents.ncog.gov.in लाइव्ह कार्यक्रमासाठी तुम्ही या लिंकला भेट देऊ शकता. हे पैसे डीबीटीच्या (Direct Benefit Transfer) माध्यमातून अर्थात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जाणार आहे.

पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात.

दरम्यान पीएम शेतकरी सन्मान निधीच्या वेबसाइटनुसार कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि कुणाला यातून वगळ्यात येणार हे स्पष्ट करण्यात आले आहे. पीएम शेतकरी सन्मान निधीचा फायदा त्यांना घेता येईल ज्यांच्या नावावर शेत असेल. अर्थात पूर्वीप्रमाणे ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जोपर्यंत शेत तुमच्या नावावर होत नाही तोपर्यंत या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

कोण आहेत अपात्र शेतकरी?

-संस्थात्मक शेतकरी

-असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी

-घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.

-केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)

-केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.

-मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत.

-तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही

-नोंदणी प्रक्रियेत चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.

हे वाचा-मोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा

योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन

या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता.

-याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल

-त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा

-याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका

-कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल

-तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल

-ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता

First published:

Tags: PM Kisan, PM narendra modi