मोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा

मोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा

सरकार आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पहिली विक्री सोमवारी, 17 मे 2021 रोजी (Sovereign Gold Bond Scheme) सुरू करणार आहे. ही विक्री पुढील पाच दिवसांसाठी सुरू राहिल.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे. सरकार आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉवरेन गोल्ड बॉन्डची पहिली विक्री सोमवारी, 17 मे 2021 रोजी (Sovereign Gold Bond Scheme) सुरू करणार आहे. ही विक्री पुढील पाच दिवसांसाठी सुरू राहिल. सॉवरेन गोल्ड बॉन्ड भारत सरकार RBI कडून जारी करतं.

कधी-कधी होईल SGB ची विक्री -

- सॉवरेन गोल्ड बॉन्ड मेपासून सप्टेंबरपर्यंत सहा हप्त्यांमध्ये दिले जातील.

- 17 ते 21 मे दरम्यान पहिल्या सीरीजसाठी खरेदी करता येऊ शकते. यासाठीचे बॉन्ड 25 मे रोजी जारी केले जातील.

- 24 मे ते 28 मेपर्यंत दुसऱ्या सीरीजसाठी सब्सक्रिप्शन सुरू होईल, या काळात 1 जूनला गोल्ड बॉन्ड इश्यू केले जातील.

- 31 मेपासून 4 जूनपर्यंत तीसरी सीरीज येईल, यासाठी गोल्ड बॉन्ड 8 जून रोजी जारी होतील.

- 12 जुलै ते 16 जुलैपर्यंत चौथ्या सीरीजसाठी सब्सक्रिप्शन ओपन होईल, यासाठी बॉन्ड जारी होण्याची तारीख 20 जुलै आहे.

- 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पाचवी सीरीज ओपन होईल आणि 17 ऑगस्टला बॉन्ड जारी होईल.

- 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत सहावी सीरीज ओपन होऊन, 7 सप्टेंबरला गोल्ड बॉन्ड इश्यू होईल.

(वाचा - Work From Home चा कंटाळा आलाय? आता निसर्गाच्या सान्निध्यात काम करण्याची संधी)

कुठे खरेदी करता येईल -

जर सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर याची खरेदी मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज सारख्या NSE, BSE मधून करता येईल. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमधूनही खरेदी करता येऊ शकते. स्मॉल फायनान्स बँकांमधून याची विक्री होणार नाही.

बॉन्डची किंमती कशी ठरते -

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड बॉन्डच्या किंमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडकडून जारी झालेल्या किंमतीच्या, सामान्य सरासरी किंमतीवर असेल. ही किंमत गुंतवणुकीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन व्यावसायिक दिवसांमध्ये 99.9 शुद्धतेच्या सोन्याची सरासरी किंमत असेल.

बॉन्ड खरेदी करण्यासाठी ऑनलाईन किंवा डिजीटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांना बॉन्डच्या किंमतीत 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट मिळेल.

(वाचा - पृथ्वीवरील लाईफलाईन! या ठिकाणी मिळतोय जगातला 20 टक्के ऑक्सिजन)

किती करता येईल गुंतवणूक -

सॉवरेन गोल्ड बॉन्डचा कालावधी आठ वर्षांचा असेल, यात पाच वर्षांनंतर बॉन्ड काढण्याचाही पर्याय आहे. यात 1 ग्रॅम सोन्याच्या खरेदीपासून गुंतवणूक करता येते. या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब (HUF) एका आर्थिक वर्षात कमीत कमी एक ग्रॅम आणि अधिकाधिक चार किलोग्रॅम गोल्डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्टसारख्या इतर संस्था वर्षाला 20 किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतात.

Published by: Karishma Bhurke
First published: May 13, 2021, 9:49 PM IST

ताज्या बातम्या