मराठी बातम्या /बातम्या /मनी /Akshay Tritiya 2021: मुहूर्तावर करा सोन्यामध्ये गुंतवणूक, मोठा नफा मिळवण्याची सुवर्णसंधी

Akshay Tritiya 2021: मुहूर्तावर करा सोन्यामध्ये गुंतवणूक, मोठा नफा मिळवण्याची सुवर्णसंधी

अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) शुभमुहूर्तावर सोनं (Gold) खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं मोठ्या संख्येनं लोकं या दिवशी सोनं खरेदी करतात किंवा सोन्यात गुंतवणूक (Investment) करतात. या मुहूर्तावर सोनं खरेदी करून तुम्हीही यातून चांगला फायदा मिळवू शकता.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 14 मे: अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) शुभमुहूर्तावर सोनं (Gold) खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळं मोठ्या संख्येनं लोकं या दिवशी सोनं खरेदी करतात किंवा सोन्यात गुंतवणूक (Investment) करतात. या मुहूर्तावर सोनं खरेदी करून तुम्हीही यातून चांगला फायदा मिळवू शकता. कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत (Corona Virus Second Wave) सध्या सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price) सध्या चढउतार सुरू आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47 हजार 700 रुपये आहे. त्यामुळं सध्या सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. तज्ज्ञांच्या मते, पुढील एक ते दीड वर्षात सोन्याच्या किंमती उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊ शकतो.

    सोन्याचा दर 50 हजारांपर्यंत जाऊ शकतो

    मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) यांच्या अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांच्या पार जाऊ शकते. गुंतवणूकदार या वेळी चांगला नफा कमवू शकतात. सध्याच्या सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला सुमारे 3300रुपयांचा नफा मिळू शकेल.

    हे वाचा-काहीच वेळात मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना गिफ्ट, खात्यात पाठवणार 2000 रुपये

    12 ते 15 महिन्यांत वाढू शकतात किमती

    या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, येत्या 12 ते 15 महिन्यात सोन्याच्या किंमती नवीन विक्रम नोंदवू शकतात. 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, महागाई वाढण्याची अपेक्षा, मध्य पूर्वेतील तणाव, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या किंमती वाढू शकतात,असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

    हे वाचा-मोदी सरकार देतंय स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी, पाहा कसा घ्याल या योजनेचा फायदा

    काय आहे आजचा सोन्याचा दर

    दिल्लीत सध्या 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46 हजार 110रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 110 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत प्रति किलो 71 हजार 500 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 44 हजार 920 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 45 हजार 920 रुपये आहे.

    First published:

    Tags: Gold