मराठी बातम्या /बातम्या /मनी /

17 मे पासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची सुवर्णसंधी! बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं

17 मे पासून मोदी सरकार देतंय स्वस्त सोनेखरेदीची सुवर्णसंधी! बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घ्या सोनं

आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा (Sovereign gold bond) पहिला टप्पा  17 मे रोजी जारी केला जात आहे. एकूण पाच दिवस तुम्हाला गोल्ड बाँड खरेदी करता येणार आहे

आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा (Sovereign gold bond) पहिला टप्पा 17 मे रोजी जारी केला जात आहे. एकूण पाच दिवस तुम्हाला गोल्ड बाँड खरेदी करता येणार आहे

आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा (Sovereign gold bond) पहिला टप्पा 17 मे रोजी जारी केला जात आहे. एकूण पाच दिवस तुम्हाला गोल्ड बाँड खरेदी करता येणार आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 14 मे: जर तुम्ही स्वस्त सोने खरेदी (Gold Price Today)करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकार तुमच्यासाठी एक खास योजना घेऊन आलं आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करून गुंतवणूक करू शकता. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा (Sovereign gold bond) पहिला टप्पा  17 मे अर्थात सोमवारपासून जारी केला जात आहे. एकूण पाच दिवस तुम्हाला गोल्ड बाँड खरेदी करता येणार आहे. अर्थात 17 मे पासून पाच दिवस बाजारभावापेक्षा (Gold Market Price) कमी किंमतीत सोनं खरेदी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) दिलेल्या माहितीनुसार सॉव्हरेन गोल्ड बाँड मे ते सप्टेंर या दरम्यान सहा टप्प्यांमध्ये जारी केले जातील. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा पहिला टप्पा 17 मे ते 21 मे दरम्यान जारी केला जात आहे. पुढील टप्पा 24 मे ते 28 मे दरम्यान असणार आहे

हे वाचा-अक्षय तृतीयेदिवशी शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट, पाठवले जाणार 19000 कोटी

सॉव्हरेन गोल्ड बाँड म्हणजे काय?

सरकारकडून आरबीआयच्या माध्यमातून हे सॉव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातात. या योजनेचा मुख्य उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे हा आहे, जेणेकरून सोन्याची आयात कमी केली जाईल.  याप्रकारच्या सोन्यात तुम्हाला फिजिकल स्वरुपात सोने मिळत नाही. आणि शुद्धतेबाबात बोलायचे झाले तर, हे सोने इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मिळत असल्याने शुद्धतेबाबत फसवणूक होण्याची शक्यता नाही आहे. 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गोल्ड बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. यामध्ये तुम्ही एक ग्रॅमच्या पटीमध्ये गुंतवणूक करू शकता. या बाँड्सचा मॅच्यूरिटी पीरिएड 8 वर्षांचा असतो. मात्र तरी देखील 5 वर्षांनी प्रीमॅच्यूअर विड्रॉल करता येते.

हे वाचा-शेतकऱ्यांसाठी Good News! वार्षिक 6000 च नाही तर मिळतील दरमहा 3000, वाचा सविस्तर

Sovereign Gold Bond ची विक्री बँक, सर्व कमर्शिअल बँका (आरआरबी, लघू वित्त बँक व्यतिरिक्त),स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. या योजनेअंतर्गत व्यक्तिगत गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंबीतील सदस्य एका आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलोग्रॅम गोल्‍डसाठी गुंतवणूक करू शकतात. ट्रस्ट आणि यासारख्या दुसऱ्या कंपन्या दरवर्षी 20 किलो गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करू शकतात. सॉव्हरेन गोल्ड बाँडच्या प्रत्येक अर्जासाठी PAN आवश्यक आहे.

First published:

Tags: Gold, Gold bond