मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?

किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर ते पैसे कोणाला मिळणार? त्याची नोंदणी कुठे करायची? वाचा सविस्तर

किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर ते पैसे कोणाला मिळणार? त्याची नोंदणी कुठे करायची? वाचा सविस्तर

किसान सन्मान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर ते पैसे कोणाला मिळणार? त्याची नोंदणी कुठे करायची? वाचा सविस्तर

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार समजली जाते. या योजनेंतर्गत, सरकार 1 वर्षात 3 हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांना 6000 रुपयांची मदत देते. प्रत्येक हप्त्यात रु. 2,000 उपलब्ध आहेत.

या योजनेत कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळतो. म्हाला माहीत आहे का की, जर योजनेच्या लाभार्थीचा मृत्यू झाला, तर अशा स्थितीत पैसे कोणाला दिले जातील?

आत्तापर्यंत किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता देण्यात आला. 12व्या हप्त्याची शेतकरी डोळे लावून वाट पाहत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान, 2000 रुपयांचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर किसान योजनेचे पैसे कोणाला मिळणार?

पीएम किसान योजनेच्या भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मृतांच्या वारसांना त्याचा लाभ दिला जाईल. मात्र यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जे या अटीची पूर्तता करणार नाहीत त्यांना तो निधी मिळणार नाही.

Facebook च्या 12 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर

नोंदणी बंधनकारक

लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या वारसाला स्वतंत्र पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करावी लागेल. याशिवाय हे वारस शासनाच्या अटींची पूर्तता करतात की नाही हेही पाहिले जाईल. शेतकऱ्याच्या वारसांनी या योजनेअंतर्गत केलेल्या नियमांची पूर्तता केल्यास त्यांना या योजनेचा लाभ निश्चितच मिळेल.

कसं तपासायचं नाव

नाव तपासण्यासाठी, किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल. या विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा. यानंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव निवडा. आता Get Report वर क्लिक करा, आता लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता.

Leave Encashment म्हणजे काय? EL मधून मिळालेल्या पैशांवर कर भरावा लागतो का?

या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत करा

सरकारने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही 155261 वर कॉल करू शकता. यावर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल.

केंद्र सरकारने अलीकडेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा जाहीर केली आहे. जर तुम्ही या योजनेशी संबंधित असाल तर तुम्ही KCC चा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता.

First published:

Tags: Farmer, Money, PM Kisan