मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही योजनेचा निधी; काय आहे कारण?

आतापर्यंत सरकारने या योजनेचे 11 हप्ते वर्ग केले आहेत.

आतापर्यंत सरकारने या योजनेचे 11 हप्ते वर्ग केले आहेत.

आतापर्यंत सरकारने या योजनेचे 11 हप्ते वर्ग केले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : देशातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, तसंच बाजारात शेतीमालास अपेक्षित दर न मिळाल्याने आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी, तसंच त्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं, या उद्देशाने केंद्र सरकार निरनिराळ्या योजना राबवतं. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची त्यापैकीच एक योजना होय. या योजनेतून दर वर्षी 6000 रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते; मात्र ही रक्कम तीन हप्त्यांत दिली जाते. आतापर्यंत सरकारने या योजनेचे 11 हप्ते वर्ग केले आहेत.

लवकरच 12वा हप्तादेखील वर्ग केला जाईल; पण शेतकऱ्यांकडून एखादी चूक झाल्यास हा हप्ता त्यांना मिळू शकणार नाही. त्याचप्रमाणे या योजनेच्या लाभासाठी काही निकष आहेत. त्यांची पूर्तता होत नसेल तरीदेखील शेतकऱ्यांना रक्कम मिळू शकणार नाही. `झी बिझनेस हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

मोदी सरकारकडून देशातल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये मदत म्हणून दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत दिली जाते. आतापर्यंत या योजनेतून 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान 2000 रुपयांचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होईल; पण शेतकऱ्यांकडून काही चूक झाली किंवा निकषांचं पालन झालं नाही तर ही रक्कम त्यांना मिळू शकणार नाही.

31 मे 2022 रोजी या योजनेचा 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर रोजी 11 वा हप्ता जमा करून चार महिने पूर्ण झाले आहेत. आता लवकरच 12 व्या हप्त्याची रक्कम बॅंक खात्यावर जमा होईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ आपल्याला मिळाला आहे का हे शेतकरी ऑनलाइन तपासू शकतात. यासाठी पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावं. तिथं तुम्हाला Farmers Corner हा ऑप्शन दिसेल. त्यानंतर Beneficiary List या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवं पेज उघडेल. या पेजवर तुमचं राज्य, जिल्हा, तालुका, गावाचा तपशील भरावा. हा तपशील भरल्यानंतर Get Report वर क्लिक करावं. Get Reportवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांची यादी दिसेल. यात तुम्ही तुमचं नाव तपासू शकता.

मोत्यांची शेती करुन कमावले लाखो रुपये; बिहारच्या शेतकऱ्याचा अजब कारनामा

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तातडीनं पूर्ण करून घ्या. याशिवाय ज्यांनी मागच्या मूल्यांकन वर्षात आयकर भरला आहे, त्यांना या योजनेच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंबातली एखादी व्यक्ती महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेत नोकरीला असेल तर ती या योजनेच्या कक्षेबाहेर राहील. एखादा शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी घटनात्मक पदावर असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल तर त्याला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनीअर, वकील किंवा सीए यांना या योजनेतून लाभ घेता येणार नाही.

5G Launch In India : 5G नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

एखाद्या शेतकऱ्याला वर्षाला 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो या योजनेसाठी पात्र नाही. संस्थात्मक भूधारक या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत. शेतकरी कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने कर जमा केल्यास त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातला सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि मुलंय. तसंच तुमच्याकडे शेतजमीन नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे तुमची शेतजमीन आजोबा, वडील किंवा कुटुंबातल्या अन्य सदस्याच्या नावावर असेल तर तुम्हाला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी निकष आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Farmer, PM Kisan