नवी दिल्ली, 18 जुलै : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता जास्त काळ करावी लागणार नाही. कारण याच महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा केले जाणार आहेत. वर्षभरात तीन वेळा सरकारकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 हजार ट्रान्सफर केले जातात. सरकारने याची कोणती तारीख जाहीर केली आहे पाहूया. या तारखेला येणार पैसे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी 14 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. ज्याचा फायदा सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना होईल. पीएम मोदी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सुमारे 18 हजार कोटी रुपये पाठवणार आहेत. याआधी या योजनेच्या 13 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंमटध्ये पाठवण्यात आले आहेत. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता 14 वा हप्ता जारी करतील. यासोबतच ते लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. याआधीही खुद्द पीएम मोदींनी अनेक हप्ते जारी केले आहेत.
PM Kisan Yojana : E- KYC केलं का? टेन्शन नका घेऊ, आता चुटकीसरशी होणार काम कोणाला मिळते ही रक्कम देशात सुरू असलेल्या लाभदायक आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरजू आणि गरिबांपर्यंत लाभ पोहोचवला जातोय. यामध्येच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी चालवली जातेय. ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. ज्याद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळतेय. यावेळी 14 वा हप्ता जारी केला जाणार आहे. पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा लाभ मिळेल? 6 ऐवजी येतील 12 हजार, जाणून घ्या नियम हप्ता हवा असेल तर केवायसी आवश्यक या योजनेचा लाभ हा पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो. त्यामुळेच योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी ऑनलाइन किंवा बायोमेट्रिकद्वारे जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन करता येऊ शकते. याशिवाय ही प्रक्रिया ऑनलाइनही पूर्ण करता येते.