नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना, पीएम किसान योजना म्हणून ओळखली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर या महिन्यात चौदावा हप्ता येणार आहे. तो येण्याआधी शेतकऱ्यांना E KYC करणं आवश्यक आहे. जे शेतकरी E KYC करणार नाहीत त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे येणार नाहीत. E KYC करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. आता हे E KYC करणं जास्त सोपं होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना फिंगर फ्रिंट अत्यावश्यक होतं. मात्र ही अट आता काढण्यात आली आहे. त्यामुळे E KYC करणं किचकट नसून अगदी सोपं होणार आहे. शेतकरी घरबसल्या आपल्या फोनवरुन E KYC अगदी सहज करु शकतात. PM Kisan : 14 व्या हप्त्याचे पैसे हवेत ना? मग विसरु नका हे काम, उरलेय फक्त 2 दिवस पीएम किसान मोबाईल अॅप डाऊनलोड करा. तिथे OTP, फिंगर फ्रिंट किंवा तुमचा चेहरा देखील स्कॅन करु शकता. मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला पहिल्यांदा ऑथेंटिकेशन करणं अत्यावश्यकच आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष 6,000 रुपयांचे आर्थिक लाभ दिले जातात. ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती परंतु ती डिसेंबर 2018 पासून लागू केली जात आहे. 8.1 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम-किसानचे 13 हप्ते अदा करण्यात आले आहेत.
PM Kisan Yojana: तुम्हाला मिळणार की नाही 14th Installment चा लाभ?पीएम किसान योजनेचं अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’वरून सहज डाउनलोड करता येते. नवीन अॅप वापरण्यास अतिशय सोपे आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना योजना आणि पीएम-किसान खात्यांशी संबंधित महत्त्वाची माहितीही मिळेल. शेतकरी जमीन पेरणीची स्थिती तपासू शकतात, बँक खात्यांशी आधार लिंक करू शकतात आणि ‘नो यूजर स्टेटस मॉड्यूल’ वापरून ई-केवायसी केलं आहे की नाही त्याचं स्टेटस पाहू शकता.