मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Kisan Update: खात्यात पैसे आले नाहीत तर कुठे तक्रार करायची? 

PM Kisan Update: खात्यात पैसे आले नाहीत तर कुठे तक्रार करायची? 

शेतकऱ्यांनी कुठे तक्रार दाखल करायची याबाबत जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांनी कुठे तक्रार दाखल करायची याबाबत जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांनी कुठे तक्रार दाखल करायची याबाबत जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता आता डिसेंबरपर्यंत खात्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. अनेक शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचेही पैसे मिळाले नाहीत. यामागे काही कारण असू शकतात ती तपासून पाहाणं आवश्यक आहे. E KYC न केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही. पण ज्या शेतकऱ्यांनी सगळी प्रक्रिया केली आणि तरीही त्यांना लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कुठे तक्रार दाखल करायची याबाबत जाणून घेणार आहोत.

आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने नुकतेच 12 व्या हप्त्याचे पैसे कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केले आहेत, परंतु अद्याप लाखो शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे वर्ग केले जातील असे सांगितले आहे. सर्व शेतकर्‍यांच्या खात्यावर देण्यात येईल.

PM Kisan Update: शेतकऱ्यांना कधी मिळणार 13 वा हप्ता? तारीख आली समोर

ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत ते सर्व शेतकरी कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात अशा माहिती सरकारने दिली आहे. ३० तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे येतील. जर 12 व्या हप्त्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्ही तुमच्या लेखपाल आणि कृषी अधिकारी यांच्याकडेही तक्रार करू शकता.

शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 वर कॉल करू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याचे अपडेट मिळेल. यासोबतच तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर किंवा थेट हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

PM Kisan Samman Nidhi: 'या' चुका केल्या तर खात्यात येणार नाहीत पैसे, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना इशारा

स्टेटस कसं चेक करायचं?

1. यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

2. यानंतर Farmers Corner वर क्लिक करा.

3. आता लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा.

4. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.

5. येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक अपलोड करा

6. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

First published:

Tags: Farmer, Pm modi