Home /News /money /

PM Kisan Scheme: तुमच्या खात्यामध्ये 18 दिवसानंतर येणार 2000 रुपये! त्याआधी पूर्ण करा हे काम

PM Kisan Scheme: तुमच्या खात्यामध्ये 18 दिवसानंतर येणार 2000 रुपये! त्याआधी पूर्ण करा हे काम

PM Kisan Samman Nidhi Yojana: देशातील शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात येणारी आर्थिक मदत काही दिवसातच त्यांच्या खात्यामध्ये पोहोचणार आहे.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: मोदी सरकारकडून शेतकऱ्यंना आर्थिक मदत मिळावी याकरता शेतकरी सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध टप्प्यांमध्ये तीन हप्त्यात प्रत्येकी 2 हजार असे 6 हजार रुपये पाठवले जातात. आतापर्यंत 6 टप्प्यात शेतकऱ्यांना हप्ते पाठवण्यात आले आहेत. सरकार तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयांचा पुढील हप्ता पाठवण्याच्या तयारीत आहे. या योजनेअंतर्गत पाठवण्यात येणारा सातवा हप्ता 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे.  अर्थात 18 दिवसानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये  ही रक्कम पोहोचणार आहे. गेल्या 23 महिन्यात केंद्राने 11.17 कोटी शेतकऱ्यांना 95 कोटींची मदत केली आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार ज्या तीन हप्त्यात पैसे देते, त्यातील पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान देण्यात येतो. दुसरा 1 एप्रिल ते 31 जुलै तर तिसरा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर. जर कागदपत्र योग्य असतील तर तुम्हाला यावेळी पाठवण्यात येणाऱ्या हप्त्याचा देखील लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती तपासून पाहा, जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही समस्या येणार नाही. जर तुमच्या वैयक्तिक किंवा बँकिंग डिटेल्समध्ये गडबड असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. (हे वाचा-या दानशुराला सलाम! 2020 मध्ये अझीम प्रेमजी यांनी दररोज दान केले 22 कोटी) पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्ग 11.17 कोटी शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे, तसंच 3.33 कोटी नवीन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी चांगली संधी आहे. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 1.3 कोटी शेतकऱ्यांना यामुळेच फायदा मिळालेला नाही. रेकॉर्डमध्ये गडबड असल्यामुळे किंवा आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत. काहींच्या नावाचे स्पेलिंग देखील चुकीचे आहे. योजनेसाठी अशी करा तुमच्या नावाची नोंदणी -https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याठिकाणी असणाऱ्या Farmer Tab वर क्लिक करा -pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तपासू शकता -Farmer Tab वर क्लिक करून याठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता. -फार्मर टॅबवर new registration वर क्लिक करून नवीन अर्ज करता येईल -त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला आधार क्रमांक (Aadhar) एंटर करावा लागेल. (हे वाचा-Gold Price: 3 रुपयांनी महागलं सोनं तरीही दर 50000 पेक्षा जास्त, चांदीही वधारली) -याशिवाय शेतकऱ्यांना नाव, जेंडर, श्रेणी,  बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतिथी इत्यादी माहिती द्यावी लागेल -त्याचप्रमाणे जमीनाची आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील -सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा -या फॉर्मची एक प्रिंट तुमच्याकडे ठेवा इथे तपासा तुमचा रेकॉर्ड -https://pmkisan.gov.in/ याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता -तुम्ही या योजनेकरता अर्ज केला आहे किंवा आधार कार्ड क्रमांक अपलोड झाला नाही आहे किंवा कोणत्याही कारणामुळे क्रमांक चुकीचा दाखल झाला असेल, तर याबाबतची माहिती तिथे मिळेल. अशा सुधारा रजिस्ट्रेशनमधील चुका पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या  अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर अर्ज करताना झालेल्या चुका सुधारता येतात. वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरवर जा आणि त्याठिकाणी Edit Aadhaar Details वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा योग्य आधार नंबर टाकता येईल. जर तुमचे नाव चुकीचे असेल किंवा आधारवरील नावाशी जुळत नसेल तर ही चूक देखील सुधारता येतेय. आणखी मदतीसाठी तुम्ही लेखपाल किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता. थेट करा कृषी मंत्रालयाशी संपर्क या योजनेबाबत तुम्हाला जर काही समस्या किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कृषी मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर: 18001155266 (हे वाचा-नोकरदारांना मिळू शकते मोठी भेट! PF सबसिडीची घोषणा करण्याच्या विचारात सरकार) पीएम शेतकरी सन्मान हेल्पलाइन नंबर:155261 पीएम शेतकरी सन्मान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401 पीएम शेतकरी सन्मानची नवी हेल्पलाइन: 011-24300606 पीएम शेतकरी सन्मानची आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109 ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Farmer, PM Kisan

    पुढील बातम्या