नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: देशांतर्गत भारतीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) हलकीशी वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात केवळ 3 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान आज चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. एक किलो चांदीचे दर (Silver Price Today) 451 रुपयांनी वाढले आहेत. याआधी मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 50,111 रुपये प्रति तोळावर पोहोचल्यावर बाजार बंद झाला तर चांदीचे दर मंगळवारी 61,572 रुपये प्रति किलो होते. सोन्याचे नवे दर (Gold Price, 11 November 2020) दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे दर केवळ 3 रुपये प्रति तोळाने वाढले आहे. यानंतर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 50,114 रुपये प्रति तोळा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वाढून 1,877 डॉलर प्रति औंस झाले आहेत. चांदीचे नवे दर (Silver Price, 11 November 2020) चांदीमध्ये मात्र आज सोन्याच्या तुलनेत अधिक तेजी आली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर बुधवारी 451 रुपये प्रति किलोने वाढले. यानंतर आज चांदी 60,023 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बुधवारी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही आहे. याठिकाणी चांदीचे दर 24.20 डॉलर प्रति औंसवर आहेत. (हे वाचा- या दिवाळीला 10 रुपयांची नोट करेल तुम्हाला मालामाल! असे मिळतील हजारो रुपये) (हे वाचा- … तर दिवाळीआधी दिवाळं! SBI चा 42 कोटी ग्राहकांना अलर्ट, अजिबात करू नका हे काम) का वाढले मौल्यवान धातुचे दर एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी असे म्हटले आहे की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाले आहे. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये थोडीशी का होईना तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे त्याचाही परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवरही परिणाम झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.