नोकरदारांना मिळू शकते मोठी भेट! PF सबसिडीची घोषणा करण्याच्या विचारात सरकार

नोकरदारांना मिळू शकते मोठी भेट! PF सबसिडीची घोषणा करण्याच्या विचारात सरकार

केंद्र सरकार पुढील प्रोत्साहन पॅकेजमध्ये रोजगारासाठी पीएफ सबसिडीची घोषणा करू शकते. हे अनुदान कर्मचारी आणि रोजगारनिर्मिती करणारी कंपनी दोघांसाठी 10 टक्के पीएफ स्वरूपात असू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर:  केंद्र सरकार पुढील प्रोत्साहन पॅकेजमध्ये रोजगारासाठी पीएफ सबसिडीची (PF Subsidy) घोषणा करू शकते. हे अनुदान कर्मचारी आणि रोजगारनिर्मिती करणारी कंपनी दोघांसाठी  10 टक्के पीएफ स्वरूपात असू शकते. केंद्र सरकारने 31 मार्च  रोजी पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana) बंद केली होती. मात्र सरकार पुन्हा एकदा ही योजना बनवण्याचा प्लॅन आखत आहे.

मनी कंट्रोलमधील बातमीनुसार पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या नवीन आवृत्तीअंतर्गत पुढील दोन वर्षांसाठी नव्या रोजगारासाठी शासनाकडून अनुदानाची घोषणा केली जाऊ शकते.

कुणाला मिळत होता योजनेचा फायदा?

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकार नवीन कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत EPF आणि EPS मध्ये 12 टक्क्यांचे योगदान देत असे. या योजनेचा लाभ 1 एप्रिल, 2016 पर्यंत ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या आणि ज्यांचे मासिक वेतन 15,000 रुपयांपर्यंत आहे अशा कर्मचार्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

(हे वाचा-Gold Silver Rates: धनत्रयोदशीआधी सोनंचांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा नवे दर)

दोन वर्षांसाठी मिळू शकते अनुदान

मनी कंट्रोलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अंतिम केला असून सरकार पुढील आर्थिक पॅकेजमध्ये या योजनेची घोषणा करू शकते. पुढील दोन वर्षांसाठी अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. मात्र ही योजना सुरू होण्यास 6-7 महिने लागू शकतात.

(हे वाचा-बँक खात्याशी संबंधित हे काम केलंय का? सीतारमन यांनी दिली मार्च 2021ची डेडलाइन)

कुणाला मिळणार फायदा?

या प्रस्तावानुसार या सबसिडी योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचा पगार 15000 रुपये प्रति महिनापेक्षा जास्त असता कामा नये. यापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एखाद्या विद्यमान कंपनीत 50 किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असल्यास त्या कंपनीला किमान दोन नवीन भरती करण्यास सांगितले जाऊ शकते. जर त्यात 50 हून अधिक कर्मचारी असतील तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी पाच नवीन नोकरभरती कराव्या लागतील.

पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या वेबसाइटनुसार, एक नवीन कर्मचारी तोच आहे जो 1 एप्रिल 2016 आधी ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपनीत काम करत नाही. जर या नव्या कर्मचार्‍याकडे नवे यूएएन (UAN) नसेल तर ते नियोक्त्याकडून (रोजगार देणारी कंपनी) ईपीएफओ पोर्टलद्वारे प्रदान केले जाते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 11, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या