मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM KISAN: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियमात मोठा बदल, लाभ मिळवण्यासाठी आता रेशन कार्ड आवश्यक

PM KISAN: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियमात मोठा बदल, लाभ मिळवण्यासाठी आता रेशन कार्ड आवश्यक

PM Kisan या योजनेमध्येही काही घोटाळे समोर आल्याचं चित्र (PM Kisan Samman Nidhi Scam) आहे. दरम्यान ही घोटाळेबाजी रोखली जावी याकरता सरकारने या योजनेसाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे.

PM Kisan या योजनेमध्येही काही घोटाळे समोर आल्याचं चित्र (PM Kisan Samman Nidhi Scam) आहे. दरम्यान ही घोटाळेबाजी रोखली जावी याकरता सरकारने या योजनेसाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे.

PM Kisan या योजनेमध्येही काही घोटाळे समोर आल्याचं चित्र (PM Kisan Samman Nidhi Scam) आहे. दरम्यान ही घोटाळेबाजी रोखली जावी याकरता सरकारने या योजनेसाठी रेशन कार्ड अनिवार्य केले आहे.

    मुंबई, 22 ऑक्टोबर: शेतकऱ्यांच्या कृषी कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यांना आर्थिक साहाय्य मिळावं याकरता सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते. आता या योजनेच्या पोर्टलवर रेशन कार्ड क्रमांक दाखल केल्यानंतरच शेतकरी पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला पीएम शेतकरी सन्मान निधीचा  (PM KISAN Installment) 2000 रुपयांचा हप्ता मिळेल. अर्थात या योजनेच्या नोंदणीसाठी आता रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेत सध्या बदल करण्यात आले आहेत, त्यापैकी हा एक महत्त्वाचा बदल आहे. आता रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह इतर कागदपत्रांची सॉफ्टकॉपी पोर्टलवर अपलोड करता येईल. वाचा-या कर्मचाऱ्यांना 9488 कोटींचं फेस्टिव्ह गिफ्ट, DA वाढल्यानंतर किती मिळणार पगार? कागदपत्रांची हार्डकॉपी सबमिट करणे आवश्यक नाही पीएम किसान योजनेसाठी नोंदणीच्या नवीन प्रणाली अंतर्गत, यापुढे रेशन कार्ड क्रमांकाशिवाय नोंदणी करणे शक्य होणार नाही. या व्यतिरिक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता दूर केली गेली आहे. आता पोर्टलवर कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून अपलोड करावी लागेल. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. तसेच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खात्यात कधी जमा होणार PM KISAN चा पुढील हप्ता केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. मीडिया अहवालांनुसार, केंद्र सरकार (Central Government) पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत दुप्पट करण्याचा विचारात आहे.  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. दरम्यान मोदी सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. वाचा-दीपिका पादुकोणचा जगभरात डंका, ADIDAS ची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनली अभिनेत्री 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करा, मिळतील 4000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत नोंदणी करण्याची संधी आहे. जर तुम्ही आता अर्ज केला आणि तो अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला नोव्हेंबरमध्ये 2,000 रुपये आणि डिसेंबरमध्ये 2000 रुपये मिळतील. अशाप्रकारे तुम्हाला 4,000 रुपये मिळू शकतात. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतात 6000 रुपये पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. वाचा-पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा भडका, ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांपेक्षा जास्त वधारले भाव घरबसल्या करा नोंदणी -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता. -याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका -कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल -तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल -ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Government, PM Kisan, Pm narenda modi

    पुढील बातम्या