मुंबई, 22 ऑक्टोबर: पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) दिवसेंदिवस वाढत आहेत. आज 22 ऑक्टोबर रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price on 22nd October) किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. आजच्या वाढीनंतर केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 5 रुपयांनी वधारले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. IOCL ने जारी केलेल्या दरानुसार आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 112.78 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लीटर 103.63 रुपये आहेत. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांपेक्षा जास्त वधारले भाव आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यात इंधनाचे दर 17 वेळा वाढवण्यात आले आहेत. फक्त तीन दिवस वगळता दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांनी महाग झाले आहे, तर डिझेलही 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. वाचा- या कर्मचाऱ्यांना 9488 कोटींचं फेस्टिव्ह गिफ्ट, DA वाढल्यानंतर किती मिळणार पगार? चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर » दिल्ली पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल 95.62 रुपये प्रति लीटर » मुंबई पेट्रोल 112.78 रुपये आणि डिझेल 103.63 रुपये प्रति लीटर » चेन्नई पेट्रोल 103.92 रुपये आणि डिझेल 99.92 रुपये प्रति लीटर » कोलकाता पेट्रोल 107.44 रुपये आणि डिझेल 98.73 रुपये प्रति लीटर या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपार आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी केल्या जातात. वाचा- वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी अशाप्रकारे तपासा इंधनाचे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (Check Fuel prices via SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.