मराठी बातम्या /बातम्या /मनी /PM Kisan: या मोबाइल अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळतील 6000 रुपये, वाचा काय आहे प्रक्रिया

PM Kisan: या मोबाइल अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळतील 6000 रुपये, वाचा काय आहे प्रक्रिया

Google Play Store मधून हे अ‍ॅप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल आणि त्यानंतर नोंदणी प्रक्रिया करू शकता. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे

Google Play Store मधून हे अ‍ॅप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल आणि त्यानंतर नोंदणी प्रक्रिया करू शकता. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे

Google Play Store मधून हे अ‍ॅप तुम्हाला डाऊनलोड करावे लागेल आणि त्यानंतर नोंदणी प्रक्रिया करू शकता. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. अलीकडेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला होता. दरम्यान 9.75 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट पाठवले आहेत. ही रक्कम साधारण 19,500 कोटींपेक्षाही जास्त आहे. कोरोना पँडेमिक काळात छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख कोटींपेक्षा जास्त मदत मिळाली आहे.

PM KISAN जीओआय अ‍ॅपवर करा नोंदणी

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करता येईल. याकरता तुम्ही पीएम किसानच्या www.pmkisan.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरून किंवा मोबाइल अ‍ॅपवरून नोंदणी करू शकता. पीएम किसान योजनेच्या सीमा वाढवण्यासाठी एनआयसी (National Informatics Centre) ने मोबाइल अ‍ॅप डेव्हलप आणि डिझाइन केले आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस सीएससी काउंटर (Post Office CSC counters) वरूनही नोंदणी करू शकता.

हे वाचा-Petrol Price Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी काय आहे पेट्रोल-डिझेल दर,इथे तपासा दर

पीएम शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही Google Play Store वरून PMKisan GOI Mobile App डाउनलोड करूनही नोंदणी करू शकता. ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. आणि या अॅपमध्ये स्थानिक भाषा देखील उपलब्ध आहेत.

वाचा काय आहे प्रक्रिया?

>>Google play store वरून PMKISAN GoI Mobile App

>> हे अॅप ओपन करून NEW FARMER REGISTRATION वर क्लिक करा

>> यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि यानंतर Continue वर क्लिक करा

>> यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक अकाउंट डिटेल्स, आयएफएससी कोड इत्यादी एंटर करा

>> सबमिट बटणवर क्लिक करून तुमचं पीएम किसा मोबाइल अॅपवर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल

First published:
top videos

    Tags: Farmer, PM Kisan, PM narendra modi