Home /News /money /

काय आहे तुमचं Status? जाणून घ्या PM Kisan च्या स्टेटसमध्ये असं लिहून आल्यास काय होतो अर्थ

काय आहे तुमचं Status? जाणून घ्या PM Kisan च्या स्टेटसमध्ये असं लिहून आल्यास काय होतो अर्थ

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत. तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या निधीचे स्टेटस चेक करू शकता

    नवी दिल्ली, 06 जानेवारी: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे 2000 रुपये पाठवण्यात आले आहेत. ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांना हे पैसे पाठवण्याचं काम सुरू आहे. 1 जानेवारी रोजी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र काही शेतकरी असे आहेत की जे लाभार्थी असूनही त्यांना पैसे मिळालेले नाहीत. तुम्हालाही पैसे मिळाले नसतील तर चिंता करू नका. आज सकाळी पीएम किसानच्या पोर्टलवर चेक केल्यानंतर एक मेसेज ग्राहकांना दिसत आहे. स्टेटसमध्ये लिहून येतेय ही बाब अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीएम किसानचे पैसे मिळाले नाही आहेत. स्टेटस तपासताना त्याठिकाणी कमिंग सून असे लिहून येत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात लवकरच पीएम शेतकरी सन्मान निधीचे पैसे येतील. ही समस्या लवकर ठीक झाल्यास तुम्ही पुढील स्टेप पूर्ण करू शकता. हे वाचा-Stock Market updates: शेअर बाजार उघडताच आपटला, सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण अशाप्रकारे तपासा स्टेटस याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. फार्मर कॉर्नर'वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही मिळणाऱ्या हप्त्याचं स्टेटस काय आहे हे आधार, बँक डिटेल्स  आणि मोबाइल नंबरच्या साहाय्याने माहित करुन घेऊ शकता. हे वाचा-भारतीयांनी मोठ्या प्रमाणात केली सोनेखरेदी, सोन्याने मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड! पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या यादीत तपासा तुमचं नाव -तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी देखील करू शकता. -याठिकाणी या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव तुम्हाला सहजरित्या मिळू शकेल. सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी या वेबसाइटवर अपलोड केली आहे. याठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील समजेल. यासंदर्भातील माहिती तुम्ही किसान आधार नंबर/अकाऊंट नंबर आणि मोबाइल नंबरच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. -'फार्मर कॉर्नर'वर जाऊन Beneficiary Status च्या लिंकवर क्लिक करा. -याठिकाणी तुम्हाला आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाइल नंबर द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही Get Report वर क्लिक केल्यास सर्व यादी मिळू शकेल. -याठिकाणी सरकार लाभार्थ्यांची पूर्ण यादी देखील अपलोड करते.  
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: PM Kisan, PM narendra modi

    पुढील बातम्या