जाहिरात
मराठी बातम्या / मनी / भारतीयांनी मोठ्या प्रमाणात केली सोनेखरेदी, सोन्याने मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड!

भारतीयांनी मोठ्या प्रमाणात केली सोनेखरेदी, सोन्याने मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड!

भारतीयांनी मोठ्या प्रमाणात केली सोनेखरेदी, सोन्याने मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड!

Gold Import in India: भारतात सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतानं गेल्या वर्षात तब्बल 1,050 टन सोनं आयात (Gold Import in India) करून 10 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 06 जानेवारी: भारतात सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतानं गेल्या वर्षात तब्बल 1,050 टन सोनं आयात (Gold Import in India) करून 10 वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. 2021 मध्ये देशात एकूण 55.7 अब्ज डॉलर्सचे सोनं आयात करण्यात आले आहे. यापूर्वी 2011 मध्ये 53.9 अब्ज डॉलर्सचे सोने आयात करण्यात आले होते. 2020 मध्ये भारतानं 23 अब्ज डॉलरपेक्षा कमी किमतीचं सोनं आयात केलं होतं. त्याच्या तुलनेत 2021मधील आकडा दुप्पट आहे. सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, 2020 मध्ये 430 टन सोने आयात करण्यात आले होते, तर 2021 मध्ये त्याचे प्रमाण दुपटीने वाढून 1050 टनांवर पोहोचले आहे. कोरोना साथीच्या पहिल्या वर्षात 2020 मध्ये सोन्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी घट झाली होती. कारण कोरोनाच्या निर्बंधांमुळे विवाह समारंभ पुढं ढकलण्यात आले होते. यामुळे 2020 मध्ये देशाने सोन्याच्या आयातीवर फक्त 22 अब्ज डॉलर्स खर्च केले. मार्च 2020 मध्ये देशात कडक लॉकडाउन (Lockdown in India) लागू करण्यात आला होता, त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवनही ठप्प झाले होते. लग्नसमारंभ पुढं ढकलण्यासह अक्षय्य तृतीयासारखे सणही कमी प्रमाणात साजरा झाला याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला, असं कोलकात्यातील सोन्याचे घाऊक विक्रेते हर्षद अजमेरा यांनी सांगितलं. हे वाचा- Gold Price Today: सोने दरात वाढ, चांदीचा भावही वधारला; जाणून घ्या लेटेस्ट रेट 2021मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोन्याची किंमत कमी झाली, त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ऑगस्ट 2020 मध्ये, भारतीय बाजारात सोन्याची किंमत (Gold Price) 56,191 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचली होती, हा एक नवीन विक्रम होता; पण मार्च 2021 मध्ये हा दर 43,320 रुपये झाला होता. त्यामुळे त्याच महिन्यात 177 टन सोनं आयात करण्यात आलं. तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 86 टन सोनं आयात करण्यात आलं होतं, डिसेंबर 2020 मधील 84 टनांपेक्षा ते किंचित जास्त होतं. हे वाचा- खिशाला परवडत नाहीये Petrol Price? अशाप्रकारे मोफत मिळेल 71 लीटर इंधन गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जागतिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली होती, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ती कमी झाली. दुसऱ्या तिमाहीत ही मागणी 10 टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत 7 टक्के होती. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहीत 831 टन सोन्याची खरेदी झाली, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेनं दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात