Home /News /money /

PM Jan-Dhan Account: तुम्ही देखील जन धन खाते उघडले असेल तर मिळेल 1.3 लाखांचा फायदा, वाचा सविस्तर

PM Jan-Dhan Account: तुम्ही देखील जन धन खाते उघडले असेल तर मिळेल 1.3 लाखांचा फायदा, वाचा सविस्तर

PM Jan-Dhan Account: जर तुम्ही देखील पंतप्रधान जन धन योजनेमध्ये (PMJDY) खातं उघडलं असेल तर तुम्हाला 1.3 लाखाचा लाभ मिळेल. तुम्हाला याअंतर्गत एक महत्त्वाची सुविधा देण्यात येईल

    नवी दिल्ली, 28 मे: पंतप्रधान  जनधन योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana- PMJDY) भारतातील लोकांना जन धन खातं (Jan Dhan Account) उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीबातील गरीब व्यक्तीने बँकेत खातं उघडलं आहे. तुमचही बँकेत हे खातं असेल तर याबरोबर काही वित्तिय लाभ देखील तुम्हाला मिळतील. जाणून घ्या सविस्तर 01.30 लाख रुपयांचा लाभ पंतप्रधान  जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी खातं उघडलं आहे त्यांना 1.30 लाखापर्यंत लाभ मिळतो. यामध्ये अपघाती विमा देखील मिळतो. खातेधारकाला 1,00,000 रुपयांचा अपघात विमा आणि 30,000 रुपयांचा जनरल विमा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर खातेदाराचा अपघात झाला तर 30,000 रुपये दिले जातात. या दुर्घटनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात, म्हणजे एकूण 01.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. जन धन खात्याचे फायदे -खात्यात कमीतकमी शिल्लक (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याची मर्यादा नाही. -सेव्हिंग अकाउंट इतकेच व्याज मिळेल हे वाचा- जून महिन्यात कोणत्या दिवशी राहणार बँका बंद, खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा यादी -मोबाइल बँकिंगची मोफत सुविधा -2 लाखापर्यंत अपघाती विमा कव्हर -10 हजार रुपयांपर्यंक ओव्हरड्राफ्ट सुविधा -रुपे कार्ड सुविधा कसं उघडाल खातं? -प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जाते. -तुम्हाला तुमचे जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. -त्याठिकाणी तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. हे वाचा-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका! 1 जूनपासून प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे -अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल. -तसेच PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाउंट उघडू शकता. -भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचं वय 10 वर्षांपेक्षा अधिक आहे ते जन धन खातं उघडू शकतात.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Insurance, Money, Pradhan mantri jan dhan yojana

    पुढील बातम्या