मराठी बातम्या /बातम्या /मनी /Home Loan: स्वस्त गृहकर्जासाठी कोणता पर्याय अधिक चांगला; Floating Rate की Fixed Rate? जाणून घ्या सविस्तर

Home Loan: स्वस्त गृहकर्जासाठी कोणता पर्याय अधिक चांगला; Floating Rate की Fixed Rate? जाणून घ्या सविस्तर

Cheaper Home Loan: तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि गरजांचे मूल्यांकन करून दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता. होम लोन घेताना व्याजदर कमी असलेलं लोन घेणं कधीही चांगलं.

Cheaper Home Loan: तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि गरजांचे मूल्यांकन करून दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता. होम लोन घेताना व्याजदर कमी असलेलं लोन घेणं कधीही चांगलं.

Cheaper Home Loan: तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि गरजांचे मूल्यांकन करून दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता. होम लोन घेताना व्याजदर कमी असलेलं लोन घेणं कधीही चांगलं.

  नवी दिल्ली, 28 डिसेंबर : कोरोना महामारीनंतर आता घरांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. अनेकजण स्वत:च्या मालकीचं घर विकत घेण्याचा विचार करत आहेत. तर, दुसरीकडे इतिहासामध्ये पहिल्यांदाच गृहकर्जांचे व्याजदर (Home loan rates) खूप कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, घर घेण्यासाठी ही चांगली वेळ आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मार्केट एक्सपर्टच्या (Market Experts) मते, घर खरेदीसाठी ही नक्कीच चांगली वेळ आहे. होम लोन घेण्यापूर्वी, व्याज दर काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती ईएमआय (EMI) भरावा लागेल फक्त हेच जाणून घेणं पुरेसं नाही. होम लोनच्या परतफेडीसाठी बराच कालावधी लागतो. म्हणूनच होमलोनची सर्व फीचर्स आणि पर्याय पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला चांगली डील मिळेल.

  होमलोन घेण्यासाठी फिक्स्ड रेट (Fixed Rate) चांगले आहेत की फ्लोटिंग रेट (Floating rate) हा प्रश्न होमलोन घेणार्‍यांच्या मनात एकदम सुरुवातीला येतो. याबाबत अतिशय सावधगिरीनं निर्णय घ्यावा लागतो कारण, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. दोन्हींचेही काही फायदे आणि तोटे आहेत. या दोन्ही रेटमध्ये काय फरक आहे आणि यापैकी कोणता पर्याय तुमच्यासाठी चांगला असू शकतो, याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.

  वाचा : Income Tax विभागाची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस

  फिक्स्ड इंटरेस्ट रेट (Fixed interest rate)

  फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे स्थिर व्याजदर हा असा दर आहे जो बाजारातील परिस्थितीनुसार बदलत नाही. निश्चित दराच्या कर्जामध्ये, होमलोन घेताना व्याजदर निश्चित केला जातो आणि हा दर लोनचा कालावधी संपेपर्यंत कायम असतो. जर तुम्ही फिक्स्ड रेटची निवड करणार असाल तर तुमच्या ईएमआयचा (EMI) सहज अंदाज लावता येतो. यामुळं तुम्हाला तुमचं बजेट निश्चित करण्यासही मदत होते. याशिवाय, व्याजदर स्थिर राहिल्यामुळं तुम्ही होमलोनच्या परतफेडीचा प्लॅन सहजपणे करू शकता.

  फिक्स्ड इंटरेस्ट रेटच्या लोनची परतफेड कधी आणि कशी करावी?

  फिक्स्ड रेट लोनच्या किंमती सामान्यतः फ्लोटिंग रेट लोनपेक्षा थोड्या जास्त असतात, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दोन्हींच्या किंमतीमध्ये मोठी तफावत असेल तर तुम्ही फ्लोटिंग रेट लोनचीदेखील निवड करू शकता. याउलट जर दोन्हींमध्ये खूप जास्त तफावत नसेल तर तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती आणि गरजांचे मूल्यांकन करून दोन्हीपैकी एक पर्याय निवडू शकता. होम लोन घेताना व्याजदर कमी असलेलं लोन घेणं कधीही चांगलं.

  वाचा : MTNL च्या शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट; काय आहे कारण?

  फ्लोटिंग इंटरेस्ट रेट

  फ्लोटिंग इंटरेस्ट रेटसह होमलोन घेतल्यास, त्याचे व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार कमी-जास्त होतात. या प्रकारामध्ये होम लोन घेतल्यास ईएमआयचा अंदाज लावता येत नाही. फ्लोटिंग रेटचा एक फायदा होतो की, जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा तुम्हाला कमी ईएमआय भरावा लागतो. याउलट जेव्हा व्याजदर वाढलेले असतात तेव्हा जास्त ईएमआय भरावा लागतो. दरम्यान, होमलोनचे व्याजदर वारंवार वाढल्यास तुम्ही कर्जदात्याला (Lenders) मुदत वाढवण्याची विनंती देखील करू शकता.

  फ्लोटिंग इंटरेस्ट रेटची निवड कशी कराल ?

  कालांतरानं व्याजदर कमी होतील असा तुमचा अंदाज असेल, तर तुम्ही फ्लोटिंग रेट होम लोनची निवड करू शकता. कमी व्याजदरामुळे तुमच्या कर्जावर लागू होणारे इतर व्याजदरही भविष्यात कमी होतील. जर तुम्हाला रिअल इस्टेट मार्केटची (The real estate market) सखोल माहिती असेल तर फ्लोटिंग इंटरेस्ट होम लोनचा पर्याय निवडणं कधीही चांगलं. होमलोनचे दर लवकरच कमी होतील अशी तुम्हाला अपेक्षा असल्यास हा पर्याय निवडणंच फायदेशीर ठरू शकतं. फ्लोटिंग रेटमध्ये वैयक्तिक कर्जदार म्हणून कोणतंही पार्ट-प्रीपेमेंट (Part-prepayment) किंवा फोरक्लोजर शुल्क भरावं लागत नाही.

  वाचा : कपड्यांसह आता चप्पल-सँडल खरेदी करणं महागणार, नवीन वर्षात ग्राहकांना झटका!

  काय आहे कॉम्बिनेशन लोन?

  दोन्हीपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आहे, हे ठरवणं कठीण होत असेल तर तुम्ही कॉम्बिनेशन लोनचा (Combination loan) पर्याय देखील निवडू शकता. त्यातील काही भाग फिक्स्ड असतो तर काही भाग फ्लोटिंग असतो. साधारणपणे भविष्यात होम लोनचे दर काय असतील हे सांगणं कठीण असतं. प्रत्येकवेळी तुमच्या अंदाजानुसार कर्जाचं व्याजदर बदलू शकत नाहीत. अशा स्थितीत तुमच्यासमोर अनेक संकटं उभी राहू शकतात. मात्र, जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

  तुम्ही कधीही फिक्स्ड रेट आणि फ्लोटिंग रेट लोनमध्ये स्विच करू शकता. मात्र, स्विच करण्यासाठी तुम्हाला लेंडरला नाममात्र शुल्क द्यावं लागेल. फिक्स्ड किंवा फ्लोटिंग होम लोन व्याजदरांपैकी कोणत्या एकाची निवड करावी हे पूर्णपणे तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. म्हणून, आपल्यासाठी कोणता पर्याय अधिक चांगला असू शकतो हा सर्वस्वी आपला निर्णय असला पाहिजे.

  First published:
  top videos

   Tags: Home Loan, Rate of interest