जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सावधान! आता नोकरी देण्यासाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी

सावधान! आता नोकरी देण्यासाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी

सावधान! आता नोकरी देण्यासाठी थेट होतेय PM मोदींच्या नावे फसवणूक, उकळली जातेय नोंदणी फी

PIB Fact Check: नोकरी देण्याच्या बहाण्याने थेट मोदी सरकारच्या नावे फसवणूक केली जात आहे. पीएम रोजगार योजनेची वेबसाइट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आ

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जुलै: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत तर नोकरदार वर्गातील अनेकांच्या नोकऱ्या गेल्या (Job Loss) आहेत. दरम्यान या काळात काही ठिकाणी नोकरीच्या नव्या संधी देखील (Job Opportunities) उपलब्ध झाल्या. मात्र त्याबरोबर फसवणूकही वाढली आहे. सामान्यांना नोकरीचं आमिष दाखवत त्यांची फसवणूक केली जात आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून अर्जासाठी ठराविक शुल्क वसूल केलं जात आहे. तुम्ही देखील अशा भूलथापांना बळी पडले असाल तर वेळीच सावधान व्हा! काही अट्टल गुन्हेगार तर थेट मोदी सरकारच्या नावे फसवणूक करत आहे. पीएम रोजगार योजनेची वेबसाइट बनवून त्या माध्यमातून फसवणूक केली जात आहे. तुम्ही अशा फेक वेबसाइटवर क्लिक करणं किंवा त्याठिकाणी नोकरीसाठी अर्ज करणं टाळा. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फरमेशन ब्युरो या संस्थेच्या फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने याबाबत लोकांना सावध केले आहे. या बनावट वेबसाइट बाबत पीआयबी फॅक्ट चेकने माहिती दिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने काय केलं आहे ट्वीट? पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, https://pmrojgaaryojna.in या वेबसाइटच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत आणि 100 रुपये नोंदणी शुल्क मागितले जात आहे.

जाहिरात

पीआयबीने पुढे म्हटलं आहे की, ही वेबसाइट आणि हे नोटिफिकेशन फेक आहे. नागरिकांना अशा कोणत्याही वेबसाइटवर विश्वास न ठेवण्याची विनंती PIB ने केली आहे. **हे वाचा-** EPFO Update: कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा लाभ, वाचा काय आहे ही महत्त्वाची योजना तुम्हीही करू शकता फॅक्टचेक जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्वीटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात